ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी
  • Aavaj Daily Team
  • Mon 21st Jul 2025 03:41 pm

कराड/प्रतिनिधी : - 

 कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कार्यक्षेत्राचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर करण्याच्या प्रस्तावास बँकेच्या १०८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मान्यता देण्यात आली. याबाबतचा अधिकृत प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. सुभाष एरम यांनी दिली. 

 सध्या बँकेचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, रत्नागिरी, रायगड तसेच मुंबई व उपनगरे येथे मर्यादित आहे. कार्यक्षेत्र वाढवून राज्यव्यापी सेवा देण्याच्या निर्णयामुळे बँकेच्या विस्तार योजनांना चालना मिळणार आहे. 

 डॉ. एरम म्हणाले, आर्थिक वर्ष २०२४-२५ अखेर बँकेचा एकूण व्यवसाय ५,८३७ कोटी रुपये इतका झाला असून, यामध्ये ठेव ३,५४७ कोटी व कर्जवाटप २,२६३ कोटी इतके आहे. बँकेचे भांडवल पर्याप्तता प्रमाण १५.२७ टक्के असून, ४५ कोटी रुपयांचा ढोबळ नफा व २६.४७ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. बँकेने यंदा सभासदांना ८ टक्के लाभांश जाहीर केला आहे. बँकेच्या २९ शाखांनी १ कोटींपेक्षा जास्त नफा कमावला असून, सातारा शाखेने ७ कोटींच्या नफ्याचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे ३५ शाखांचे एनपीए (अनुत्पादक कर्ज) शून्य आहे. सध्या बँकेच्या ६७ शाखा कार्यरत असून, वाई, बार्शी, पंढरपूर, सांगोला व सातारा एमआयडीसी येथे नव्या शाखांची भर पडली आहे. येत्या सहा महिन्यांत हडपसर, चाकण, शिरवळ, इचलकरंजी व नातेपुते येथे शाखा सुरू होणार आहेत. डिजिटल सेवांना चालना देत यावर्षी मोबाईल व इंटरनेट बँकिंग सेवा अधिक सुलभ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्रणाली अंतर्गत कामकाजात वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. बँकेचे एनपीए प्रमाण पाच टक्क्यांच्या आत ठेवण्याचे उद्दिष्टही यावेळी जाहीर करण्यात आले. 

 सभासदत्वाबाबतच्या निर्णयामध्ये बँकेच्या प्रतिमेला बाधा पोहचवणाऱ्या सात सभासदांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. या निर्णयालाही सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली. 

दिलीप गुरव यांना कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार मुख्य कार्यकारी पदावरून निवृत्त झालेले सीए दिलीप गुरव यांना कार्यकारी संचालकपदाची नवी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या जागी सीए धनंजय शिंगटे यांची प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिलीप गुरव यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल सभेत संचालक मंडळ आणि सभासदांच्या वतीने सत्कार करण्यात आला.  

सभेतील एकमताने मंजूर झालेले निर्णय सभेत अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, कार्यकारी संचालक दिलीप गुरव, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी सीए शिंगटे, संचालक व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. सभेपुढील सर्व १८ विषय खेळीमेळीत मंजूर करण्यात आले.



©2026. All Rights Reserved.