ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड
  • Aavaj Daily Team
  • Sat 11th Oct 2025 12:25 am

कराड/प्रतिनिधी : - 

दि. कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडच्या अध्यक्षपदी समीर सुभाषराव जोशी आणि उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा कार्यालयाचे संजयकुमार सुद्रिक यांनी अध्यासी अधिकारी म्हणून निवड प्रक्रिया पार पाडली.

नवनिर्वाचित अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या सत्कार समारंभात अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी म्हणाले, "सन २०२२ पासून बँकेच्या व्यवस्थापनात तरुण नेतृत्वाचा समावेश करण्याचे धोरण राबवले आहे. संचालक मंडळातील नव्या पिढीला जबाबदारी देणे हा त्या प्रयत्नांचा पुढचा टप्पा आहे. बँक लवकरच ६००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करेल. बँकिंग क्षेत्रातील बदलांसोबत राहून भविष्यातील वाटचालीसाठी सक्षम नेतृत्व मिळणे ही आनंदाची बाब आहे. 

व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल लाहोटी यांनी म्हणाले, संस्थेच्या विकासात सातत्याने बदल आवश्यक असतात. डॉ. सुभाष एरम यांनी दिलेले योगदान बँकेच्या इतिहासातील सुवर्णपान आहे. व्यवस्थापनातील हा बदल बँकेच्या भविष्यकाळाशी निगडीत असून, व्यवसायाच्या ऐतिहासिक टप्प्याकडे वाटचाल सुरू राहील. 

नवीन अध्यक्ष समीर जोशी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेची वाटचाल पारदर्शकता, राजकारणरहितता आणि निस्वार्थी कारभार या तत्त्वांवर झाली आहे. या परंपरेचे पालन करून सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने बँकेचा विकास कायम ठेवू. 

उपाध्यक्ष शशांक पालकर यांनी, बँकेच्या संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या जनसंपर्क आणि व्यवस्थापन कौशल्याचा उपयोग करून व्यवसायवृद्धीला गती देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. 

सत्कार समारंभास सर्व संचालक, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे, सेवकवर्ग, सभासद व हितचिंतक उपस्थित होते.

नव्या नेतृत्वाकडून सक्षम वाटचालीची अपेक्षा

सहकारी क्षेत्रावर बँकींग रेग्युलेशन अॅक्ट आणि रिझर्व्ह बँकेच्या नियमांमुळे सभासदांचे प्रतिनिधी म्हणून काम करताना जागरूकता आवश्यक आहे. २०२२ च्या निवडणुकीत १२ नवीन संचालकांना संधी देत तरुण नेतृत्व विकसित करण्याचा प्रयत्न झाला. त्या सातत्याचा भाग म्हणूनच सर्व संचालकांनी समीर जोशी आणि शशांक पालकर यांची बिनविरोध निवड केली आहे. 

बँकेच्या वाटचालीत एरम कुटुंबाचे योगदान अमूल्य आहे. नवीन नेतृत्व बँकेला अधिक सक्षमतेकडे नेईल, याचा मला विश्वास आहे. - डॉ. सुभाष एरम (माजी अध्यक्ष, कराड अर्बन बँक) 



©2026. All Rights Reserved.