ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर
  • Aavaj Daily Team
  • Tue 5th Aug 2025 03:35 pm



कराड/प्रतिनिधी : - 


कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठीच्या सुधारित वाढीव खर्चास भाजपा-महायुती सरकारने मान्यता दिली असून, १७.१६ कोटी रुपयांच्या निधी मंजूर करण्यात आला आहे. 


या कामासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुल भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून, लवकरच या पाईपलाईनचे स्थलांतर होऊन, विमानतळ विस्तारीकरण कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.


कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असून, याठिकाणी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून विमानतळ उभा राहिले. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून सन २०२३ मध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकारामुळे कराडच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने २२१.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 


पण या निधीमध्ये भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या स्थलांतरासाठी २०१२ च्या शासन निर्णयात नमूद केलेली ८ कोटी ५० लाखांची तरतूद तशीच ठेवण्यात आली होती. वास्तविक या खर्चात संबंधित पाईपलाईनचे स्थलांतर शक्य नसल्याने, स्थलांतराअभावी विमानतळ विस्तारीकरण कामात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी, भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या स्थलांतरासाठी सुधारित वाढीव खर्चास मंजुरी मिळावी, यासाठी आमदार डॉ. अतुल भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थितीबाबत चर्चा केली होती.

आ.डॉ. अतुल भोसले यांच्या मागणीची दखल घेत, शासनाने भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाच्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन आदेश ४ ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून प्रकाशित करण्यात आला आहे. 

भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी सुधारित खर्चाला मंजुरी मिळाल्यामुळे कराड विमानतळाच्या विकासाला गती मिळणार असून, पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व आ.डॉ. अतुल भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत. 




©2026. All Rights Reserved.