ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव
  • Aavaj Daily Team
  • Thu 24th Jul 2025 05:44 pm


कराड/प्रतिनिधी : - 


कृष्णा सहकारी बँकेला मुंबई येथे दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनच्या वतीने सन २०२३-२४ साठीचा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे सहकार राज्यमंत्री ना. पंकज भोयर यांच्या हस्ते कृष्णा बँकेच्या संचालकांनी हा पुरस्कार स्वीकारला.


सहकारी बँकांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशनच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या बँकांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. या संस्थेने राज्यातील ५०० कोटी ते १००० कोटी रूपयांपर्यंतच्या ठेवी असणार्‍या नागरी सहकारी बँकांची पाहणी करून, या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणारी बँक म्हणून कृष्णा सहकारी बँकेची निवड या पुरस्कारासाठी केली.

कृष्णा बँकेने चेअरमन आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा विस्तार केला असून, सामान्य माणसांसाठी कार्य आणि सभासद हिताचा कारभार या उद्दिष्टाने बँकेने वाटचाल सुरु ठेवली आहे. बँकेच्या कार्याची नोंद घेऊन बँकेला सन २०२३-२४ साठीचा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.


मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशनचा २६ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला. या सोहळ्यात सहकार राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते कृष्णा बँकेला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, हर्षवर्धन मोहिते, विजय जगताप, संतोष पाटील, दिलीपराव पाटील, प्रदीप पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


यावेळी बोलताना भोयर म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे बँकेच्या पारदर्शक, ग्राहकाभिमुख आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीची राज्य पातळीवर झालेली अधिकृत दखल आहे. आजच्या बदलत्या आर्थिक परिस्थितीत सहकारी बँकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. पारदर्शक व्यवहार, तांत्रिक सक्षमता आणि ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक सेवा पोहोचवणे ही सहकार क्षेत्राची प्राथमिक उद्दिष्टे आहेत. सहकार क्षेत्रातील सर्व बँकांनी सामूहिकतेने, सकारात्मक दृष्टिकोनातून काम केल्यास भविष्यात मोठे चांगले बदल शक्य आहेत.

 

याप्रसंगी व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष भाऊ कड, उपाध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आदींसह बँकींग क्षेत्रातील मान्यवर व विविध बँकांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





©2026. All Rights Reserved.