ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक
  • Aavaj Daily Team
  • Fri 18th Jul 2025 06:17 pm


कराड/प्रतिनिधी : - 


कोयना सहकारी बँक लि.कराड या बँकेची सन २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीसाठीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. या निवडणुकीत नव्या नेतृत्वाची भर पडली. या निवडणुकीत अपर्णा यादवउपनिबंधकसहकारी संस्थाकराड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पारदर्शक आणि शांततेत प्रक्रिया पार पाडली.

यामध्ये आदिराज पाटील-उंडाळकर (उंडाळे) तुकाराम डुबल (म्होप्रे), हणमंत देसाई (वाठार), बाळासाहेब जाधव (पाडळी), राजकुमार पाटील (अंबवडे), सुजित थोरात (कार्वे), कृष्णत पाटील (काले), साहेबराव शेवाळे (कराड), महादेव पाटील (वारुंजी), सागर जाधव (आगाशिवनगर/मलकापूर), सीमा पाटील (आटके), रेश्मा पाटील (तांबवे), संपत बडेकर (सुपने), नदीम सुतार (कराड), लालासाहेब गिरी (मरळी/चोरे) यांची संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.


सन १९९६ मध्ये माजी सहकार मंत्री, लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर व अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या कोयना सहकारी बँकेने गेल्या काही दशकांत स्थानिक अर्थव्यवस्थेत भरीव योगदान दिले आहे. सहकार क्षेत्रात आदर्श ठरलेली ही संस्था आता नव्या पर्वात प्रवेश करत आहे.

बेकेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे बँकेने स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने ' ऑडिट वर्ग प्राप्त केला असून, रिझर्व्ह बँकेचे सर्व नियामक निकष वेळेवर पूर्ण करत आदर्श सहकारी बँकेचा मान टिकवून ठेवला आहे.


या निवडणुकीत युवानेते आदिराज पाटील-उंडाळकर यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याने नव्या पिढीचे प्रतिनिधित्व बँकेच्या व्यवस्थापनात झाले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे बँकेच्या कारभारात नव्या संकल्पना नवदृष्टी आणि तंत्रज्ञानाचा वापर यास गती मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यांचे कार्यक्षेत्रातील योगदान आणि तरुणांशी असलेला संवाद स्थानिक तरुणाईला निश्चीत नवी दिशा देईल.

अॅड. उदयसिंह पाटील यांनी नवनिर्वाचित संचालकांचे स्वागत करत, बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.


नवीन संचालक मंडळाने अॅड. उदयसिंह पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पारदर्शक कारभार करून शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक तसेच सर्वसामान्य ग्राहकांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याची ग्वाही देवून माजी सहकार मंत्री स्व. विलासकाका पाटील यांना अभिप्रेत असलेल्या सहकाराच्या मुलामंत्रास अधीन राहुंन आगामी काळात डिजिटल बँकिंग सेवा, कर्जप्रक्रियेत सुलभता, आणि ग्राहकसेवा सुधारणा या बाबतीत विशेष योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असलेचे सांगितले.  





©2026. All Rights Reserved.