ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे
  • Aavaj Daily Team
  • Thu 31st Jul 2025 08:19 pm

कराड/प्रतिनिधी : - 

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार १ ऑगस्ट २०२५ रोजी 'महसूल दिन' साजरा करण्यात येणार असून, १ ते ७ ऑगस्ट दरम्यान 'महसूल सप्ताह 2025' अंतर्गत कराड तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. महसूल विभागामार्फत नागरिकांना शासकीय योजना, सेवांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनहितार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आले असल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी दिली. 

 येथील प्रशासकीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

 प्रांताधिकारी म्हेत्रे यांनी तहसील कार्यालय कराड व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या या सप्ताहात तालुक्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच या अभियानाचे उद्घाटन १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता कराड प्रशासकीय कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर संपूर्ण आठवड्यात प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे विषय व उपक्रम निश्चित करण्यात आले असल्याचे सांगितले. यामध्ये दैनिक कार्यक्रमांत शुक्रवारी १ ऑगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी सत्कार, गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव, विविध प्रमाणपत्रांचे वितरण, शनिवारी २ रोजी २०११ नंतरच्या अतिक्रमण प्रकरणांचे निपटारा करण्यात येणार आहे. यात सकाळी १०.३० वा. ओंड, ता. कराड येथील अतिक्रमित जागेवर लाभार्थ्यांना पट्टे वाटप, तसेच घोनाशी येथे गावठाण प्लॉट जागेची तहसीलदार, गट विकास अधिकारी, उपभूमी अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या उपस्थितीत स्थळपाहणी करण्यात करून महसूल जमिनींच्या समस्यांचे समाधान करण्यात येणार आहे. 

 रविवारी ३ रोजी पाणंद रस्त्यांची मोहीम राबवण्यात येणार असून नोंदणी व मोजणी करून बेकायदेशीर अडथळे दूर करून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच माजी सैनिकांच्या प्रश्नांवर बैठक होणार आहे. सोमवारी ४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत कोपर्डे हवेली येथे आमदार मनोज घोरपडे यांच्या उपस्थितीत जनता दरबारात जनतेच्या तक्रारींचे निराकरण व विविध दाखले वाटप, त्याचबरोबर तालुक्यातील १४ मंडलांमध्ये स. १० वा. दाखले वाटप करण्यात येणार आहेत. मंगळवारी ५ रोजी विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे वाटप, बीटी कार्डचे वितरण व घरभेटी देऊन अनुदान वाटप करण्यात येणार आहे. बुधवारी ६ रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविणे, संबंधित प्रकरणांवर कार्यवाही करणे, तर गुरुवारी ७ रोजी M-Sand धोरण अंमलबजावणी, नवीन मानकांच्या अनुषंगाने मार्गदर्शक तत्वे अंमलबजावणी आणि सप्ताहाचा समारोप कार्यात येणार आहे.



©2026. All Rights Reserved.