कराड: साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस, साईसम्राट अर्बन व साईजित एक्स्पोर्टच्या वतीने छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्त आयोजित 'छत्रपती संभाजीराजे एक 'प्रेरणा' या विषयावर धैर्यशील विजयसिंह पाटील ज्यांनी मार्गदर्शन केले.
कराड:
साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस, साईसम्राट अर्बन व साईजित एक्स्पोर्टच्या वतीने छत्रपती संभाजीराजे बलिदान दिनानिमित्त आयोजित 'छत्रपती संभाजीराजे एक 'प्रेरणा' या विषयावर धैर्यशील विजयसिंह पाटील ज्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमावेळी अध्यक्षस्थानी उद्योजक अनिल पाटील उपस्थित होते.
धैर्यशील पाटील म्हणाले, 'छत्रपती संभाजीराजे यांनी ३२ वर्षांच्या कार्यकिर्दीत २२० लढाया केल्या; पण एकाही लढाईत हार पत्करली नाही. त्यांच्या जीवनातील संघर्षामध्ये त्यांनी शिवनीतीचा अवलंब केला होता.
सम्राट पाटील म्हणाले, भूतकाळाच्या छातीवर बसून वर्तमान काळाला उलटे टांगून मोगलाईबरोबर छत्रपती संभाजीराजे यांनी लढा लढून जगाच्या इतिहासात नवा इतिहास रचला.
उद्योजक अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी पृथ्वीराज नलवडे, संग्राम मोरे, शुभम शिंगे, प्रथमेश मोहिते,अथर्व शिंदे,सुमित गुरव,अमित हिरवे, प्रतीक पाटील यांच्यासह साईसम्राट इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस हॉटेल टुरिझम मॅनेजमेंटचे पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.साईसम्राट अर्बनचे मॅनेजर सुधाकर पाटील यांनी प्रस्ताविक केले तर आभार पृथ्वीराज माने मानले.
©2024. All Rights Reserved.