पाटण : शिंदे गटातील आमदार शंभूराज देसाई यांची शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदी वर्णी लागल्याने पाटण मतदारसंघातील ढेबेवाडी विभागातील कार्यकर्त्यांनी आज फटाके वाजवून आणि पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.. शंभूराज देसाई यांना महाविकास आघाडी मध्ये देखील गृहराज्यमंत्री हे मंत्रिपद मिळालं होत आणि शिंदे भाजप सरकारमध्ये त्यांच प्रमोशन होऊन त्यांना कॅबिनटमंत्री पद मिळालं आहे त्यामुळे शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आ शंभूराज देसाई यांचे समर्थक मोठ्याप्रमाणावर जल्लोष करत आहे.
©2025. All Rights Reserved.