माण : गेल्या काही दिवसांपासून माण तालुक्यात अपघाताची सुरू झालेली मालिका खंडित होण्याचे नाव घेण्याचे दिसत नाही परिणामी हे सत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दहिवडी मार्डी रोडवर आज सकाळी साडेआठच्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर १'च्या नजीक अपघाती वळणावर बस आणि दुचाकींचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले.दहिवडी होऊन मार्डीमार्गे कारखेलकडे जाणारी बस आणि मार्डी रोडहुन दहिवडीकडे येणारी दुचाकी यांची जोरदार धडक झाल्याने हा भीषण अपघात घडला. यामध्ये सोमनाथ भीमराव माने (वय 18 वर्षे,)तुषार गणपत माने (वय 21 वर्षे रा लोणंद ता. माळशिरस )व दीपक भीमराव फुले (वय 22 वर्षे रा.दहिगाव ता.माळशिरस) हे तिघे गंभीर जखमी झाले. सकाळी साडेआठच्या सुमारात हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या तिघांनाही तात्काळ ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथे हलवण्यात आले, परंतु तेथे त्यांच्यावर उपचार होऊन न शकल्याने त्यांना पुढील उपचारासाठी चारुशिला एक्सीडेंट हॉस्पिटल, वडूज या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती ग्रामीण रुग्णालय दहिवडी येथून मिळाली.
©2025. All Rights Reserved.