ना .एकनाथ शिंदे यांच्या रूपाने जावली महाबळेश्वर या तालुक्या बरोबरच जिल्ह्यातील खेडोपाड्यात पावसाळ्यातील अतिवृष्टीमुळे लोकांना खरा मदतीचा हात मिळालाच पण वैद्यकीय आर्थिक मदतीच्या सेवेमुळे ना. एकनाथ शिंदे यांचा जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी गाजावाजा झाल्यानेच आज जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदार त्यांच्या सोबत आहेत एकनाथ ओंबळे शिवसेना नेते जावली
जावली : जावली विधानसभा मतदारसंघ हा जावली महाबळेश्वर व सातारा तालुक्यांतील 36 गावांना जोडलेला होता 2000 च्या दशकापर्यंत डोंगराळ विभाग असल्याने या मतदार संघातील कोणत्याही आमदारांना साध मंत्रीपद मिळाले नाही .यातच विधानसभा मतदार संघातील रचना बदललेल्या जावली महाबळेश्वर हा विधानसभा मतदार संघ बरखास्त होवून याची विभागणी वाई खंडाळा महाबळेश्वर हा विधानसभा मतदारसंघ झाल्याने व सातारा जावली हा स्वतंत्र विधानसभा मतदार संघ तयार झाल्यानंतर येथील प्रस्थापित राजकारणी लोकांचे पुनर्वसन करण्यात आल्याने जावली तालुक्यात पाहिले मंत्रिपद कोरेगांवचे आ. शशिकांत शिंदे यांच्या रूपाने मिळाल्याने जावळीतून आनंद तर व्यक्त झालाच पण तदनंतरच्या काळात राष्ट्रवादीशी फारकत घेवून भाजपावाशी झालेल्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मंत्री मिळेल अशा अपेक्षेने जावलीकर व साताराकरांच्या अपेक्षा उंचावल्या प्रचंड मताधिक्याने विजयी होऊनही राष्ट्रवादी कांग्रेस व शिवसेनेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या सरकार मध्ये मूळ जावळीतील ना.एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली त्यामुळे त्यांच्या जावली महाबळेश्वरला हवा तसा निधी उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांनी एकत्र विकास साधण्यासाठी करोड़ों रुपये खर्चून उभारलेल्या विकासात्मक पाया आजही मोठ्या प्रमाणात दिसून येत असून मागील दोन महिन्यापूर्वी कधीही मुख्यमंत्री या तालुक्यात होईल असे स्वप्न न पाहिलेल्या लोकांना आपल्या राजकिय अस्तित्वात उभारलेल्या लढ्यात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले अन जिल्हास्तरीय राजकारणी लोकांचे अस्तित्त्वात खरे तर गोंधळात टाकणारे प्रश्न निर्माण झाले. मूळ शिवसेनेत असणार्या अनेक मातब्बर पुढाऱ्यांची दुधवा मनस्थिती मुळ शिवसेना कोणती हाच प्रश्न निर्माण झाल्याने धीरगंभीरपणे काही शिवसैनिक शिंदे गटात सामील झाले. तरीही आज जावली महाबळेश्वर या मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही शिवसैनिक दाखल झाले असले तरी मूळ शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांच्याच शिवसेनेत असल्याचे सांगत असून ना.शिंदे यांनी आपली जन्मभूमीतील राजकीय भूमिका गुलदस्त्यात न ठेवता त्यांनी पुढील राजकिय धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असून त्यामुळे मागे राहिलेला मूळ शिवसैनिक पाठीशी येईल. जावळीतून 1995 विधान सभेत सर्वसामान्य शिवसैनिक यांनी निवडणुकीच्या रणांगणात जशी बाजी मारली तशीच सातारा जावली व वाई महाबळेश्वर खंडाळा या मतदार संघाबरोबर जिल्ह्यातील इतर मतदान संघातली कशी वाटचाल असेल ती गुलदस्त्यात न ठेवता तर मूळ शिवसैनिक मागे असणारे शिंदे गटात सामील होतील अशी अपेक्षा आहे.
©2025. All Rights Reserved.