सातारा : एकावर कोयत्याने वार करून जखमी केल्याप्रकरणी आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोवई नाका, सातारा येथील एसटी स्टँड कडे जाणाऱ्या रस्त्यावर किशोर विजय वारागडे वय 22, रा. मेढा ता. जावली हे त्यांच्या गाडीतून जात असताना प्रेम पार्टे, गणेश शिंदे, ऋतिक पार्टे (तिघेही रा. मेढा, ता. जावली) पंकज सपकाळ, महादेव सपकाळ (दोघेही रा. चोरांबे, ता. जावली), अभिषेक चव्हाण (रा. गांधीनगर, मेढा, ता. जावली), राहुल शेडगे, विकी पावरा (रा. जावळवाडी, मेढा, ता. जावली) यांनी वारागडे यांची गाडी अडवून त्यांच्या हातावर कोयत्याने वार केला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. याचवेळी या आठ जणांमधील कोणीतरी गाडीच्या पाठीमागे कोयता मारून गाडीची काच फोडून नुकसानही केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.
©2026. All Rights Reserved.