जावली : रुईकर( गणेश पेठ )मधील गट नंबर 370 व मौजे काटवली मधील गट नंबर 709,699 मध्ये अनधिकृत व बेकायदेशीर बांधकाम सुरू होते सदर बांधकामाची तक्रार 26/4/2022 रोजी करण्यात आली होती त्यानंतर 4/5/2022 तलाठी यांनी रुईघर या ठिकाणी जाऊन बेकायदेशररित्या बांधकामाचा पंचनामा केला. तसेच काटवली या ठिकाणी जाऊन तलाठी यांनी बेकायदेशीर उत्खनन व बांधकाम चालू असतानाही डोंगरावरून दगडी रस्त्यावर वाहून जातात त्यासाठी ताल बांधत आहे तसेच भात करतो असे दाखवून खोटं NA केला असा रसेच तलाठी यांनी खोटा पंचनामा तलाठी सादर करून प्रशासनाची दिशाभूल केली आहे तसेच आज मीतिला त्या ठिकाणी दोनशे ते अडीचशे ब्रास उत्खनन करून चार ते पाच दगडी सिमेंट भिंती बांधण्या बांधल्या आहेत व त्यावर काही दिवसात बंगल्याचे काम सुरू होणार आहे. पंचनामा केल्यानंतर रुईघर व काटवली या दोन्ही बांधकाम तात्काळ बंद करून संबंधित व्यक्तींनी प्रशासनाला संबंधित बेकादेशीर उत्खनन व बांधकामाच्या परवानगी व कागदपत्र व त्यासंदर्भात खुलासा करण्याचे आदेश संबधित धनदांडग्यांना पत्राद्वरे तहसील कार्यालयातून दिले मात्र प्रशासन खुलासा द्यायचे सोडून शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत मे बडा सरकार से बडा! अशा अविर भावात पुन्हा आज मीतिला बांधकाम या ठिकाणी राजरोसपणे सुरू आहे तसेच प्रांताधिकारी यांच्याकडून ही कारवाई करणेबाबत पत्रव्यवहार झाला आहे बेकायदेशीर काम करणाऱ्या धनदांडग्यांवर कारवाई करून माळींन ची पुनरा आवृत्ती रोखावी व सर्कल व तलाठी यांची चौकशी करावी असे न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या आदेशाने 15 ऑगस्ट दिनी किरण बगाडे तहसील कार्यालयासमोर आंदोलन छेडणार
©2025. All Rights Reserved.