कराड महसूल विभागाच्या हातावर हात मारत कराड आरटीओ कार्यालयाने मलिदा लाटण्याचा लावलेला सपाटा म्हणजे राज्य शासनाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडाच. ओव्हरलोड वाहनांना अभय देत हप्ता न देणार्या चार-दोन वाहनांवर कारवाई करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला जात आहे. तर ओव्हरलोड वाहने बिनधोकपणे चालवण्यासाठीचे रेटकार्डच अप्रत्यक्षपणे जाहीर करण्यात आल्याचे बोलले जाते.
कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात
मंथलीच्या प्रभावाने आरटीओ गांधारीच्या भूमिकेत
रेटकार्ड नुसार हप्ता द्या ; बिनधोकपणे ओव्हरलोड वाहतूक करा
पराग शेणोलकर
कराड :
कराड महसूल विभागाच्या हातावर हात मारत कराड आरटीओ कार्यालयाने मलिदा लाटण्याचा लावलेला सपाटा म्हणजे राज्य शासनाच्या तिजोरीवर टाकलेला दरोडाच. ओव्हरलोड वाहनांना अभय देत हप्ता न देणार्या चार-दोन वाहनांवर कारवाई करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला जात आहे. तर ओव्हरलोड वाहने बिनधोकपणे चालवण्यासाठीचे रेटकार्डच अप्रत्यक्षपणे जाहीर करण्यात आल्याचे बोलले जाते. त्यामुळे रेटकार्डनुसार हप्ता द्या आणि बिनधोकपणे ओव्हरलोड वाहतूक करा, असा करेक्ट कार्यक्रम कराड आरटीओ प्रशासनाकडून राबवला जात असल्याची चर्चा आहे.
कराडच्या महसूल विभागावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. टेबला खालून नव्हेतर थेट पाकिट घेऊन माती उत्खननाच्या परवानग्या देण्यात येत आहे. परवानगी देताना ढिगभर अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, त्या फक्त कागदावरच. याचा मोठा फटका मात्र कृष्णा-कोयनेच्या नदीपात्राला बसला आहे. जेसीबी पोकलॅन्ड सारखी मोठी यंत्रणा लावून उत्खनन सुरूच आहे. पारंपारिक अवजारांचा वापर करून तीन फुट खोलीपर्यंत उत्खनन करण्याचे आदेश आहेत. परंतु, त्या 20-30 फूट खोल नदी पात्रात पाण्यातूनही माती काढण्यात येत आहे.
बेकायदेशीरपणे उत्खनन केलेल्या मातीची रात्रोंदिवस राजरोसपणे ट्रक्टर, डंपरच्या मदतीने वाहतूक सुरू आहे. कराड तालुक्यात सुमारे 300हून अधिक ट्रक्टर व डंपरची वाहतूक सुरू आहे. यात अनेक वाहनांचे पासिंग नाही. बेकायदेशीरपणे वाढवलेली ट्रेलर क्षमता, अल्पवयीने चालक तसेच किती चालकांचा चालक परवाना आहे हा संशोधनाचा विषय आहे. मात्र, मंथलीच्या प्रभावाने आरटीओ प्रशासनाचा सध्या त्यांचा कारभार गांधारीच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.
-------- क्रमशः-----
फ्लाईंग स्कॉड नावालाच...
कराड-पाटण तालुक्यासाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय आहे. या कार्यालयात 20 अधिकारी व कर्मचारी असा मोठा लवाजमा आहे. तालुक्यातील अवजड वाहनांसह बेकायदेशीरपणे रस्त्यावर चालणार्या वाहनाशी संबंधित विविध कारवाया करण्यासाठी तीन फ्लाईंग स्कॉड आहेत. या स्कॉडच्या माध्यमातून विविध कारवाया केल्या जात आहेत. मात्र, महसूलशी संबंधित ओव्हर लोड वाहने, विना पासिंग वाहने, रोड टॅक्स न भरलेली वाहने दिसत नसल्याने आश्चर्य होत आहे. अनेक वेळ या स्कॉडच्या समोरूनच भरधाव वेगात ही वाहने ये-जा करताना दिसतात. त्यामुळे ही पथके फक्त कलेक्शनसाठी नियुक्त करण्यात आली आहेत की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
असे आहे मंथलीचे रेट
माती ट्रक्टर 1700 रूपये
मातीचा 2 ब्रास डंपर 2500 रूपये
मातीचा 4 ब्रास डंपर. 3500 रूपये
वाळू डंपर 5000 रूपये
सहा ते सोळा टायर 3000 रूपये
जेसीबी 5000 रूपये
वरील रेटकार्ड नुसार ओव्हरलोड वाहन मालक आरटीओ प्रशासनाला मंथली देत असल्याचे बोलले जाते आहे.
कराड आरटीओ प्रशासन फ्लाईंग स्कॉडच्या माध्यमातून कारवाई करते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात आरटीओ प्रशासन व्यस्त होते. आत आरटीओ प्रशासन मोकळे झालेले आहे. बेकायदेशीरपणे वाहतूक करणार्या वाहनांची रजिट्रेशननुसार माहिती घेऊन कारवाई केली जाईल. आणि केलेली कारवाई दिसूनही येईल.
- विनोद सगरे
उपप्रादेशिक परिवहन आधिकारी, कराड
©2025. All Rights Reserved.