जावली : अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी ग्रामपंचायतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन केलेले आहे यामध्ये 12/8/2022 रोजी सकाळी साडेदहा वाजता अमृत महोत्सव जनजागृती साठी प्रभात फेरी झालेली आहे आहे त्यानंतर साडेअकरा वाजता विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता 13/8/ 2022 रोजी सकाळी आठ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आजपर्यंत हयात असणारे सर्व माजी सरपंच उपसरपंच यांचे उपस्थितीत माजी सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अंगणवाडी वालुत येथे 1972 मधील लढाईमध्ये शहीद झालेल्या मिलेट शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबातील व्यक्तीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी दक्षता समितीतील सदस्यांमार्फत ध्वजारोहण करण्यात आले आरोग्य उपकेंद्रामध्ये सर्व बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या उपस्थितीत बचत गटाच्या प्रतिनिधीच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जि प शाळा वालुत येथे शासकीय सेवे मधून निवृत्त असणारे झालेले ग्रामस्थ व निवृत्त शिक्षक यांचे उपस्थितीत ध्वजारोहण होणार आहे त्याचबरोबर शिक्षकांच्या निवड समिती खाली विद्यार्थ्यांच्या रांगोळी स्पर्धा ,गायन स्पर्धा ,निबंध स्पर्धा ,वक्तृत्व स्पर्धा झाले 14/8/2022 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये सकाळी ग्रामपंचायतीचे विधवा महिला यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्याचबरोबर सर्व महिलांकडून ध्वजास मानवंदना देण्यात आली व स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षाच्या घोषणा देण्यात आल्या आज ग्रामपंचायतीच्या इतिहासात प्रथमच ध्वजारोहण करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती राहिली आणि प्रथमच विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व महिलांना बचत गट आणि विधवा प्रथा व शासनाचे नियम याच्यावर मार्गदर्शन झाले या कार्यक्रमात खूप महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यातूनच सर्वांनी एक मुखाने विधवा रुढी परंपरा अन्यायकारक प्रथा बंद करून सर्व महिलांना ताट मानेने समाजापुढे वावरता यावे फिरता यावे त्याचबरोबर कार्यक्रमात उपस्थित राहता यावे यासाठी विधवा रुढी प्रथा बंद करण्याचा साठीची मागणी सर्व महिलांनी एकमुखाने केली आणि घोषणा देऊन विधवा प्रथा बंद करण्याची मागणी केलीत्याचबरोबर शाळेमध्ये माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण होऊन शाळेतील मुलांना त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर लहान मुलांचा बाल बाजार ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भरवण्यात आला या बाल बाजारचा सर्व ग्रामस्थांनी आनंद घेऊन सर्व मुलांचे आणलेला बाजार संपेपर्यंत खरेदी करण्यात आला त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे विकास सेवा सोसायटीचे चेअरमन व माजी चेअरमन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले असे विविध कार्यक्रम आज खूप मोठ्या प्रमाणात साजरे झाले या कार्यक्रमास खूप प्रमाणात ग्रामस्थ देखील उपस्थित होतेअमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असताना 15 ऑगस्ट 2022 या रोजी वालूथ ग्रामपंचायतच्या इतिहासात नाव कोरले जाईल या पद्धतीचा हा 15 ऑगस्ट चा कार्यक्रम आज पार पडला आजच्या या कार्यक्रमासाठी गावातील सर्वच ग्रामस्थ आणि महिला यांची उपस्थिती लक्षणीय म्हणजे जवळपास साडेतीनशे च्या आसपास व सर्व विद्यार्थी आणि मुले मुले पकडली तर 400 च्या आसपास होती ग्रामपंचायतच्या इतिहासामध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर 14- -15 तारखेला देखील महिला उपस्थित राहिल्या या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा सर्वच ग्रामस्थांनी आनंद घेतला विविध कार्यक्रमांमध्ये मुख्य कार्यक्रम म्हणजे सर्व ठिकाणचे ध्वजारोहण आणि त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ त्याचबरोबर शाळेसाठी देणगी देणाऱ्या थोर देणगीदारांचे सत्कार समारंभ त्याचबरोबर कक्ष अधिकारी म्हणून नेमणूक झालेले शेखर भिलारे त्याचबरोबर पीएचडी केलेले अजिंक्य पवार , नवे पोलीस पाटीलयांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला माजी सरपंच माजी चेअरमन माजी शिक्षक सर्व ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी ताई आशाताई आरोग्य सेविका आरोग्य मदतनीस मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामविकास अधिकारी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सर्व सदस्य व ग्रामपंचायतचे सर्व सदस्य या सर्वांचा गेली चार दिवसापासून चा हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मेहनत केली म्हणून यांचे विशेष सत्कार करण्यात आला. झालेल्या या कार्यक्रमानंतर ग्रामसभेमध्ये ठरल्याप्रमाणे आज विधवा प्रथा बंद करण्याबाबतचा एकमुखी ठराव आजच्या या ग्रामसभेमध्ये संमत करण्यात आला
©2026. All Rights Reserved.