वाई : चांदवडी येथे केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत चांदवडी पुनर्वसन गावाला ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार व पाठपुरावा केल्यामुळे प्राप्त झालेल्या नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन करण्यात आले.
चांदवडी येथे श्री नवलाई देवीचा नवरात्र उत्सव सुरू आहे, या उत्सवाचे औचित्य साधून गावातील ज्येष्ठ सुहासिनी ज्यांनी चांदवडी गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर वेगवेगळ्या रुपात स्वतःचे घर तसेच गाव उभे केले अशा सर्व आदिशक्तींच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.या योजनेअंतर्गत गावाला नवीन पाणी टाकी, नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन व नळ कनेक्शन प्राप्त होणार आहे. त्यासाठी सुमारे 35 लक्ष 80 हजार 544 रुपये एवढा निधी मिळाला असून वर्क ऑर्डर देखील झाली आहे. व एका वर्षाच्या आत ही योजना पूर्ण होणार आहे असे चांदवडीचे सरपंच जयदीप शिंदे म्हणाले.
भूमिपूजन प्रसंगी सुभद्रा बाबुराव शिंदे, ताराबाई राजाराम शिंदे, सुंदराबाई बाळकृष्ण शिंदे, जगुबाई रामचंद्र शिंदे, पार्वती बाळासो गाडेकर, लिलाबाई प्रकाश शिंदे, कमल रामदास शिंदे, द्रौपदा सूर्यकांत शिंदे, गजराबाई महादेव जाधव, लता श्रीरंग शिंदे, कांताबाई मारुती जाधव, कलाबाई गणपत काकडे, सुनंदा हिंदुराव पाटणे, नर्मदा विठ्ठल शिंदे, भारती शंकर शिंदे, उर्मिला संजय पवार, रूपाली रमेश काकडे, आशा शंकर मोरे, जयश्री बाजीराव शिंदे, संगीता रामचंद्र वाघ, रत्ना बबन गाढवे, विद्या ज्ञानेश्वर गाढवे, लिलाबाई पांडुरंग शिंदे, कांताबाई मारुती जाधव, सिंधू बाळासाहेब काकडे आदी महिला उपस्थित होत्या. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक राजाराम कृष्णा शिंदे, भानुदास महादेव शिंदे, संपतराव शिंदे, नामदेवराव काकडे, हिंदुराव पाटणे, पांडुरंग शिंदे, सूर्यकांत शिंदे, बाजीराव शिंदे, संजय पवार, जितेंद्र शिंदे, विठ्ठल शिंदे, विजय राजाराम शिंदे, सुनील आठाळे आदी उपस्थित होते.
यावेळेस सरपंच जयदीप शिंदे, उपसरपंच सुनीता शिंदे, ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच नंदा राजाराम शिंदे, ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य यमुनाबाई काकडे, सदस्य शोभा अशोक शिंदे, सदस्य संभाजी कुऱ्हाडे, यांनी सर्वांचे आभार मानले.
©2026. All Rights Reserved.