पाटण : पाटण तालुक्यातील अवसरी गावातील 22 वर्षीय तरुण म्हैस धुवायला गेल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला ;महाबळेश्वर ट्रेकर्स टीम आणि प्रतापगड रेसक्यु टीम च्या जवानांकडून ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आले
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अवसरी गावातील दत्ता रघुनाथ शिर्के वय वर्ष 22 हा आपल्या म्हशी कथी तलावात धुवायला गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला.ही घटना शनिवार दिनांक 3 सप्टेंबर 2022 रोजी घडली असून स्थानिक ग्रामस्थांनी शोधकार्य सुरु केले. शनिवार आणि रविवार दोन दिवस त्याचा शोध चालू होता शेवटी ग्रामस्थांना अपयश आले. सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी महाबळेश्वर ट्रेकर्स टीम आणि प्रतापगड रेसक्यु टीम अवसरी गावाच्या दिशेने रवाना झाली बोट च्या साहाय्याने दोन्ही टीम दत्ताचा शोध घेत होत्या. 7 तासांच्या अथक परिश्रमानंतर दत्ताचा मृतदेह शोधण्यात दोन्ही टीम च्या जवानांना यश आले या मोहिमेत महाबळेश्वर ट्रेकर्स चे सुनील बाबा भाटिया,अमित कोळी जयवंत बिरामणे, अनिकेत वागदरे, आणि प्रतापगड रेसक्यु टीम चे अजित जाधव, आशिष बिरामणे, तेजस जवळ, अभिषेक भिलारे हे जवान सहभागी होते
©2026. All Rights Reserved.