ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
ढोणे कॉलनीतल्या गोळीबार प्रकरणात 5 जणांवर गुन्हा दाखल
  • ओम सोनावले
  • Fri 7th Oct 2022 07:09 am

सातारा : दांडिया दरम्‍यान झालेल्‍या वादानंतर पाठलाग करत युवकासह स्‍थानिक नागरिकावर बुधवारी मध्‍यरात्री गोळीबार करण्‍यात आला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात पाच जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून, पोलिसांनी घटनास्‍थळावरून गोळ्या, पुंगळ्या तसेच धारदार शस्‍त्रे जप्‍त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्‍पवयी मुलास ताब्‍यात घेतले होते. अमीर शेख (रा.वनवासवाडी), अभिजित भिसे (रा. यश ढाब्‍यामागे, कोंडवे), साहिल सावंत (रा. कोटेश्‍‍वर मंदिराजवळ, शुक्रवार पेठ), यश सुभाष साळुंखे (रा. मोळाचा ओढा) अशी गुन्‍हा दाखल असणाऱ्या संशयितांची नावे आहेत.

याबाबतची माहिती अशी, साताऱ्यातील व्‍यंकटपुरा पेठेत राहणारा यश संजय बीडकर (वय- 22) हा ता. 5 रोजी मित्रासमवेत सेंट पॉल स्‍कूलच्‍या मैदानावरील दांडिया पाहून घराकडे येत होता. वाटेत अभिजित भिसे याने यश सोबतच्‍या सर्वेश महाडिकच्‍या पायावर दुचाकी घातल्‍याने त्‍यांच्‍यात वाद झाला. वादानंतर यश हा मित्रासमवेत त्‍याठिकाणाहून निघून गेला. थोड्या वेळानंतर अमीर शेख, अभिजित भिसे हे साथीदारांसमवेत दुचाकीवरून मनामती चौकात आले. येथे यश बीडकरला पाहून अमीर शेखने कमरेचे पिस्तूल काढले. शेखने यशच्‍या दिशेने गोळी झाडली. मात्र, ती त्‍याने चुकवली. याचदरम्‍यान त्‍याठिकाणी घडशी नावाचा एक व्‍यक्‍ती आला. घडशींनी शेखला असे करू नको, असे सांगण्‍यास सुरुवात केली. या वेळी शेखने घडशी यांना पकडत त्‍यांच्‍या डोक्‍याला पिस्‍तूल लावले व चाप ओढला. मात्र, गोळी मिसफायर झाली व पिस्‍तूलमधील गोळ्या खाली पडल्‍या. नागरिक आल्‍याचे पाहून अमीर शेखसह इतरांनी त्‍या ठिकाणाहून पळ काढला.सदरील घटनेची माहिती मिळाल्‍यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्‍याचे अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले. त्‍यांनी पाहणी करत घटनास्‍थळावरून रिकामी पुंगळी, जिवंत गोळ्या व घातक शस्‍त्रे जप्‍त केली. घटनास्‍थळाची पाहणी नंतर पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल, अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी केली. यश बीडकरच्‍या फिर्यादीनुसार अमीर शेखसह पाच जणांवर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. गोळीबार केल्‍यानंतर संशयित पळून गेले असून, त्‍यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. याचा तपास उपनिरीक्षक बशीर मुल्‍ला हे करीत आहेत.



©2026. All Rights Reserved.