ताज्या बातम्या
कराडला जनजागृतीचा इव्हेंट . || आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. ||
सातारा जिल्ह्यात हजरत मुहम्मद पैगंबर जयंती निमित्त 'दुवा फतेहा' 
  • Satara News Team
  • Sun 9th Oct 2022 07:53 am

सातारा  : कोणताही धर्म व धम्म हा मानवाच्या कल्याणासाठीच स्थापन करण्यात आला आहे. त्यामुळे  सर्वधर्मीय संस्थापक हे आदरणीय आहेत. याची प्रचिती खटाव तालुक्यात तसेच हुतात्मा नगरी असलेल्या वडूज मध्ये पाहण्यास मिळाली.विविध ठिकाणी हजरत मुहम्मद पैगंबर जयंती निमित्त 'दुवा फतेहा' साजरा करण्यात आला.

      सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, सातारा, वाई, फलटण, कोरेगाव, महाबळेश्वर, खंडाळा, जावळी, मेढा, कुडाळ माण तालुक्यातील म्हसवड, दहिवडी व इतर गावात तसेच खटाव तालुक्यातील पुसेगाव, खातगुण, तडवळे, वर्धनगड, कातर खटाव, खटाव, पुसेसावळी,औंध,मायणी, डिस्कळ, गोपूज, निमसोड, निढळ,मांडवे, कुमठे, नांदोशी, हिंगणे, डाळमोडी,एनकुळ आदी गावात ईद- ए- मिलाद साजरी करण्यात आली.

        इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध गावात मशीदीत नमाज अदा केली.वडूज मुस्लिम जमात यांच्याकडून बिरादरी, बागवान ,पठाण, शिकलगार, मुल्ला, शेख, डांगे, नदाफ, पिंजारी, आत्तार ,माणेर, काजी, सय्यद व मान्यवरांनी वडूज येथील मशीद येथून बाजार प्रांगणात जुलूस काढण्यात आला.त्यानंतर बदाम, काजू मिश्रित दुधाचे मोफत वाटप करण्यात आले.

 यावेळी डॉ महेश गुरव, रिपब्लिकन पक्षाचे  खटाव तालुकाध्यक्ष गणेश भोसले,रा स प चे श्रीकांत देवकर, जेष्ठ पत्रकार अजित जगताप,सामाजिक कार्यकर्ते परेश जाधव, सुनिल मिसाळ,दत्ता केंगारे,डॉ वैभव माने, आप्पासाहेब गोडसे, सौ राणी विकास काळे व मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना मनापासून हार्दिक शुभेच्छा दिल्या.

        आदरणीय इस्लाम धर्म संस्थापक हजरत मुहम्मद पैगंबर हे वयाच्या ४० व्यावर्षी प्रेषित्व प्राप्त झाले. तथापि,लहानपणापासूनच त्यांच्या आयुष्याचा खडतर प्रवास सुरू होता. लहानपणीच आई-वडिलांची छत्रछाया हरवली. आजोबा व चुलत्यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांच्यासोबत त्यांनी व्यापाराच्या निमित्ताने  प्रवास व भटकंती केली. त्यांनी

तरुणपणीच आपल्या नैतिक चारित्र्य व आचरणाने 'अलअमिन' (विश्वासू) म्हणून सन्मान प्राप्त केला होता. त्यांची प्रखर बुद्धिमत्ता व अभ्यासूवृत्ती होती.त्यांचे मन समाजाप्रती दया आणि करुणेने ओतप्रोत भरलेले होते. 'हिरा'डोंगराच्या गुफेमध्ये ते  चिंतन करीत होते. दिव्य ज्ञानाच्या स्फुल्लिंगाने एक निश्चित ध्येयासाठी हजरत मुहम्मद पैगंबराच्या कार्याला सुरुवात झाली. सच्चा, प्रामाणिक व कर्तव्य

निर्धाराने सत्य, न्याय व नीतीच्या दीन (धर्म)

इस्लामची प्रतिष्ठापना त्यांनी केली. आज जगभर इस्लाम धर्म अनेकांनी स्वीकारला आहे.त्याची ही माहिती जाणकार मंडळींनी दिली.आज दिवसभर सातारा जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत अनेक ठिकाणी फळ व सरबत व दुध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


 खटाव तालुक्यात ईद ए मिलाद निमित्त दुधाचे मोफत वाटप करताना मान्यवर( छाया-निनाद जगताप,सातारा)



©2025. All Rights Reserved.