वाई : परखंदीमध्ये बांधकाम साहित्याची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन सदाशिव महांगडे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे, या कामासाठी त्यांनी बांधकाम साहित्य आणले होते. दरम्यान, अंगणात ठेवलेले बांधकाम साहित्य परखंदी मधील जितेंद्र देशमुख यांनी चोरून नेण्याचे त्यांनी सांगितले. चोरीस गेलेले बांधकाम साहित्य जितेंद्र देशमुख यांच्या घरी सापडले तरीही सौरभ देशमुख व जितेंद्र देशमुख यांनी शिवीगाळ केला व चुकीचे वर्तणुक केल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.
©2026. All Rights Reserved.