सातारा : फलटणच्या कत्तललखान्यातून आतंकवाद्यांना आर्थिक पुरवठा केला जातो. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची आयबीने चौकशी आहे, असा गंभीर आरोप मिलिंद एकबोटे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला आहे.
ते पुढे म्हणाले, फलटणच्या कत्तलखान्यातून देशापालिकडील आतंकवाद्यांना पैसे मिळतात ही लाजिरवाणी बाब आहे. या कत्तलखान्यातून आतंकवाद्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असून आर्थिक पुरवठा केला जातोय. साताऱ्यात सदर बझार येथे देखील घरोघरी गाई कापल्या जात असून प्रशासन जाणूनबुजून याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अखिल भारतीय कृषी गोसेवा पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सांगत या प्रकरणी आयबीने आमदार रामराजेंची चौकशी केली असल्याचा खळबळजनक आरोप केलाय. यावेळी प्रतापगड येथील शिवप्रताप दिन आम्ही साजरा करतो. उत्सव साजरा करण्याची सर्व जबाबदारी आम्ही स्वीकारतो, असे सांगत शिवप्रताप दिन साजरा करण्याची परवानगी शासनाकडे मागणार असल्याचे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले.
©2026. All Rights Reserved.