फलटण : फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या महात्मा फुले भाजी मंडई येथे एक अनाथ व्यक्ती ला पॅरालीसीस चा झटका आल्याने तो साधारणपणे दोन दिवस एका जागेवर पडून लोकांकडे मदतीची याचना करत होता. भाजी मंडई मधील बसणाऱ्या भाजी मंडईतील काही लोकांनी शक्य ती मदत केली. याबाबत फलटण नगर परिषदेला कल्पना दिली गेली तरी सुद्धा कोणीही मदतीला या ठिकाणी आलं नाही. पालिकेला सांगुण सुद्धा कोणिच येत नसल्याचं पाहुण भाजी मंडई मधील काही लोकांनी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाचे उपाध्यक्ष अनुप शहा यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अनुप शहा घटणास्थळी पोहोचके आणि स्वतः काही लोकांच्या मदतीने रुग्णास रिक्षा मध्ये घेवुब हाॅस्पीटल मध्ये दाखल केले अनुप शहा यांनी दिलेल्या मदतीमुळे या अनाथ रुग्णाचे प्राण वाचले आहेत. अनुप शहा यांच्या या कामाचं कौतुक फलटण शहरात होत आहे.
©2026. All Rights Reserved.