ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
आमच्या सरकारच्या कालावधीत पुनर्वसनाचे प्रश्‍न युद्धपातळीवर सोडवले जातील : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • Satara News Team
  • Fri 12th Aug 2022 08:49 am

बामणोली  : आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याने लोकांच्या चेहर्‍यावर वेगळा आनंद आहे. या सरकारच्या कालावधीत पुनर्वसनाचे प्रश्‍न युद्धपातळीवर सोडवले जातील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, मायभूमीत मुख्यमंत्री म्हणून होत असलेल्या स्वागताने मन भरून आले आहे. सातारा जिल्हा हा पर्यटनासाठी वाव असलेला जिल्हा आहे. आमचे सरकार सातारा जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्याचे काम करेल, असेही त्यांनी सांगितले.ना. एकनाथ शिंदे हे मूळचे महाबळेश्‍वर तालुक्यातील दरे-तांब या गावचे आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले. सातारा जिल्ह्याच्या सीमेवर कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत स्वीकारत मुख्यमंत्री रात्री तापोळ्यात पोहोचले. पत्रकार परिषदेत त्यांना विविध प्रश्‍नांवर बोलते करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी पत्रकारांनी तुम्ही भूमिपुत्र असून, गेली 50 वर्षे कोयनेच्या भूमिपुत्रांचे प्रश्‍न सुटलेले नाहीत, आता तुमच्याकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत? असे विचारले असता त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, हे सरकार शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. ना. देवेंद्र फडणवीस व मी या सरकारच्या मंत्रिमंडळाचे काम पुढे नेत आहोत. हे सरकार सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी कामगारांचे व समाजातील प्रत्येक घटकाचे आहे. त्यांच्यातील माणूस आता मुख्यमंत्री झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढणे हे साहजिकच आहे. त्यांच्या अपेक्षांना न्याय देण्याचे काम सरकारच्या माध्यमातून करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.पूनर्वसनाचे प्रश्‍न रखडले आहेत ते सोडवणार का? या प्रश्‍नावर बोलताना ना. एकनाथ शिंदे म्हणाले, हे प्रश्‍न युध्दपातळीवर सोडवले जातील. भूमिपूत्रांनी जागा दिली. कोयना धरण झालं सर्वांना प्रकाश दिला. ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या युध्दपातळीवर सोडवण्यावर भर दिला जाणार आहे. आपला माणूस मुख्यमंत्री झाल्याने येथील लोकांच्या चेहर्‍यावर वेगळा आनंद आहे. स्वागत सत्कार खूप होत असतात. मात्र मायभूमीतील सत्कार हा वेगळाच असतो.जिल्ह्यातील पर्यटनावर बोलताना ना. शिंदे म्हणाले, जिल्ह्यात पर्यटनाला भरपूर वाव असून पर्यटनाला चालना देण्याचे काम आमचे सरकार करेल. लोकांना जे प्रकल्प फायद्याचे आहेत.त्याचा सकारात्मक विचार आमचे सरकार करणार आहे. आमचं सरकार डबल इंजिन आहे. त्यामुळे निधी हा डबल होणार आहे. कारण आमच्या सरकारला देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा पाठिंबा आहे. विकास करा, केंद्र सरकारकडून भरघोस निधी देण्यात येईल, असे आश्‍वासन पंतप्रधानांनी दिले आहे. नक्की या भागासाठी जे काय करता येईल ते चांगले करणार आहे. विकासाच्यादृष्टीने तरूणांना रोजगार उपलब्ध होईल, पर्यटनाला चालना मिळेल, इन्फ्रास्ट्रक्‍चर डेव्हलप करता येईल. येथे निसर्ग संपदा भरपूर आहे. नक्की विचार करुन या भागाचा विकास केला जाणार आहे. भागातील 2 ते 3 पूल प्रस्तावित आहेत त्यातील एका पूलाचे काम पूर्ण झाले आहे. बाकी पूल वरळीच्या धरतीवर केबल स्टेड करत आहोत. कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्राला जोडणार्‍या कनेक्टिव्हिटी करावयाच्या आहेत त्याचा निर्णय लवकरच होईल, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्रीमंडळ आता स्थापन झाले असून सर्व काही व्यवस्थित होईल आणि मंत्र्यांचे खातेवाटपही लवकरच केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.



©2026. All Rights Reserved.