वाई : भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की शिरगाव तालुका वाई गावाचे हद्दीत कुंबारखाणी शिवारात वाघाचा मळा येथे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ चे लघु दभाचे गेलेली लाईनची गार्डिंग तार तुटून ती ओढ्याचे वाहत्या पाण्यात पडली होती,त्यावेळी सदर ओढ्यातून साहिल लक्ष्मण जाधव वय 9 वर्षे व प्रतीक संजय जाधव वय 15 वर्षे दोघेही राहणार नाईक वस्ती यांना पडलेल्या वायरचा शॉक लागला त्यांना तातडीने भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले व त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल सातारा येथे उपचारांसाठी नेण्यात आले परंतु तेथे त्या दोघांचे निधन झाले,
ही दोन्ही मुलं शेळ्याना चारा आणणेसाठी गेली होती ओढ्याचे पाण्यातून जात असताना ही दुर्घटना घडली,यातील अन्य तीन मूल सुदैवानं वाचली घटनास्थळी भुईंज पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे पी एस आय निवास मोरे हवालदार शिवाजी तोडरमल,बापूसाहेब धायगुडे, आनंदराव भोसले,विजयराव देशमुख शँकरराव घाडगे यांनी पहाणी करून परिस्थिती नियंत्रणात ठेवली,
दरम्यान ऐन नवरात्र उत्सवात ही दुर्घटना घडल्याचे वृत्त शिरगाव येथे समजताच हळहळ व्यक्त झाली,यातील प्रतीक जाधव हा दहावीत शिकत असून दोन्ही शाळकरी मुलं हुशार असल्याने कुटुंबासह गाव शोकसागरात बुडाले आहे,
महावीतरण भुईंज शाखा अधिकारी राजेंद्र रासकर यांनी आपल्या टीम ला घेऊन वीज लाईन दुरुस्ती करून धोकादायक परिस्थिती हाताळली,
तर मुलं वाचली असती भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक सुविधा नसल्याने ही मुलं सातारा सिव्हिल ला पोहोचली पण उपचारापूर्वी मृत्यू झाली ,भुईंज ला ग्रामीण रुग्णालय किंवा अत्यावश्यक सुविधा असत्या तर ही दोन्ही मुलं वाचली असती
2 वीज वाहक लाईन या बेजबाबदार पना मुळे दुर्लक्ष करू नका लगेच महावीतरण ला कळवा असे आवाहन करण्यात आले आहे
3 काहींनी धोकादायक लाईन चक्क बांधकामात घातल्या असल्याचे चित्र पहायला मिळते याचीही ग्रामपंचायत व महसूल विभागाने चौकशी करावी अशी ही कुजबुज पत्रकाराना ऐकायला मिळाली,
©2024. All Rights Reserved.