फलटण : एचडीएफसी बँकेच्या वतीने ग्राहकांसाठी खास फेस्टिव ट्रीट्स महोत्सव आयोजित करण्यात आलाय, यामध्ये १० हजारांहून अधिक ऑफर ग्राहकांसाठी देण्यात आल्या आहेत. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या महोत्सवाचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एचडीएफसी बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.
मंगळवारी सकाळी फलटण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बाजार समितीमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना व अडत व्यापाऱ्यांना या फेस्टिव ट्रीट्समधील ऑफर विषयी माहिती देण्यात आली. या ऑफरमध्ये पर्सनल लोन, बिझनेस लोन, कार लोन, टू व्हीलर लोन, होम लोन, गोल्ड लोन यावर माफक व्याजदर आकारण्यात आला असून त्याचबरोबर इझी ईएमआय, युज्ड कार लोन, कन्ट्रक्शन साहित्यांसाठी लोन, व्यावसायिक वाहनासाठी कर्ज सुविधा, क्रेडिट कार्डवर लोन, ट्रॅक्टर लोन, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी, सिक्युरिटीजवर लोन यासह अन्य भरघोस ऑफर एचडीएफसी बँकेच्यावतीने ग्राहकांसाठी पुरविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमावेळी एचडीएफसी बँक आयोजकांकडून फलटण शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच लोकांना बँकेच्या ऑफरविषयी माहिती देण्यात आली व जास्तीत जास्त ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी फलटण, लोणंद, शिरवळ या ठिकाणच्या शाखांना भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी एचडीएफसी बँकेचे सातारा क्लस्टर हेड रोहित तेंडुलकर आणि फलटण ब्रँच मॅनेजर शांताराम कांडरकर यांनी मार्गदर्शन केले.


©2026. All Rights Reserved.