पुणे : कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.

लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे उभारण्यात आलेल्या मल्टिलेव्हल व अत्याधुनिक पार्किंग सुविधा देणाऱ्या एरोमॉलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री. सिंधिया यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे, विमानतळाचे कार्यकारी संचालक अनिल गुप्ता उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या नव्या बहुमजली वाहनतळामुळे पुणे विमानतळावरील वाहनतळाचा मोठा प्रश्न सुटणार आहे, असे सांगून मंत्री श्री.सिंधिया यांनी जागतिक पातळीवर नवरत्न म्हणून पुण्याला मान्यता मिळावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे सांगितले. येणाऱ्या काळात पुणे-सिंगापूर हवाई सेवेसह नवीन टर्मिनल कार्यान्वित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मंत्री पाटील यांनी लवकरच सर्व सुविधांनी युक्त विमानतळ पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल, विमानतळ प्राधिकरण त्यासाठी आवश्यक प्रयत्न करेन अशी अपेक्षा व्यक्त केली.
एअरोमॉलची वैशिष्ट्ये...
©2024. All Rights Reserved.