ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
सह्याद्रि हॉस्पिटल, कराड येथे शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग
  • Aavaj Daily Team
  • Thu 3rd Jul 2025 02:12 pm

कराड/प्रतिनिधी : - 

सह्याद्रि हॉस्पिटलकराड येथील एका बंदिस्त विभागात बुधवार (दि. २) जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे किरकोळ आग लागल्याची घटना घडली. ही आग हॉस्पिटलच्या दक्ष कर्मचाऱ्यांनी तत्काळ आपत्कालीन यंत्रणा राबवत नियंत्रणात आणली असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

या पत्रकात म्हंटले आहे की, बुधवारी संध्याकाळी अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे एका विभागात आगीचे लहानसे लोळ उठले. प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशमन उपकरणांचा वापर करत आग विझवण्यास सुरुवात केली. केवळ १५ मिनिटांत आग पूर्णतः नियंत्रणात आणण्यात आली. यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन संपूर्ण विभागाची तपासणी केली. या तपासणीत आग पूर्णपणे विझवली गेली असून आत कुठेही उर्वरित धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

घटनेच्या वेळी हॉस्पिटल प्रशासनाने तत्काळ आपत्कालीन सूचना जाहीर करत लिफ्टचा वापर टाळण्याचे निर्देश सर्व रुग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांना दिले होते. ही सूचना शिस्तबद्धपणे पाळण्यात आली. संपूर्ण इमारतीतून रुग्ण व उपस्थित व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

या घटनेमुळे काही काळ हॉस्पिटलचे नियमित कामकाज थांबवण्यात आले होते. मात्र, आता सर्व सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्या आहेत. हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांची स्थिती पूर्णपणे स्थिर असून उपचार सुरळीतपणे सुरू आहेत.

या काळात रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले संयम व सहकार्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. आम्ही त्याबद्दल मनापासून आभार मानतो. कृपया कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका किंवा त्या पसरवू नका. रुग्णांची सुरक्षितता आणि काळजी हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे. या घटनेमुळे हॉस्पिटलमध्ये काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित राहून पुढील तपास करत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.  





©2026. All Rights Reserved.