ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • Satara News Team
  • Sun 28th Aug 2022 09:05 am

महाबळेश्वर  : राज्यातील पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न सोडवले जातील.त्या साठी राज्यातील पत्रकारांची प्रबळ संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदे समवेत लवकरच बैठक आयोजित करू,अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र ना.एकनाथ शिंदे यांनी दिली.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे हे महाबळेश्वर येथे मुक्कामी आहेत.राजभवन येथे प्रथमच त्यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेतली.मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम.देशमुख यांच्या सूचनेनुसार या पत्रकार परिषदे दरम्यान मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने सातारा जिल्हा पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहेत.अनेक सरकारे आली आणि गेली पण पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही .मराठी पत्रकार परिषद ही एस. एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढणारी संघटना आहे.३६ जिल्हे व ३५० तालुक्यात मराठी पत्रकार परिषदेच्या शाखा आहेत.पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्या साठी व न्याय मिळवून देण्यासाठी एस. एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ल मराठी पत्रकार परिषदेच्या आमच्या राज्यस्तरीय शिष्ट मंडळाला मुंबईत वेळ मिळावी अशी आग्रही मागणी यावेळी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांनी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या कडे केली.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी ही पत्रकारांनी मला ही खूप मदत केली आहे.त्यांचे प्रश्न नक्की सोडवू असे सांगत लवकरच मराठी पत्रकार परिषदेसंमवेत बैठक लावण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिल्या.राज्य व सातारा जिल्ह्याचे प्रश्न सोडवताना तुम्ही ही सूचना करत चला ,त्याचा नक्की विचार करू असे ही मुख्य मंत्री म्हणाले .निवेदन देताना मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, महाबळेश्वर पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास काळे,सातारा शहर पत्रकार संघाचे खजिनदार राहुल तपासे,सोशल मीडिया सेलचे चंद्रसेन जाधव, वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विश्वास पवार,सातारा जिल्हा इले.मिडियाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, सोशल मीडिया सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत जगताप, इम्तियाज मुजावर,नीलेश शिंदे,दिनकर थोरात, प्रेषित गांधी,अभय हवालदार ,अजित जाधव, केळगणे,संजय दस्तुरे यांच्या सह प्रिंट , इले्ट्रॉनिक्स, सोशियल मीडिया चे पत्रकार उपस्थित होते .



©2026. All Rights Reserved.