स्वर्गीय विलासकाकांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना राजकारणात चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळावी, नवीन नेतृत्व निर्माण व्हावे, या उद्देशाने रयत संघटनेचे उभारणी केली. आज त्याच रयत संघटनेचे तीन तेरा वाजले आहेत. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तर 'आधे इधर जाओ आधे उधर चलो बाकी मेरे पीछे आओ' अशा पद्धतीने संघटनेचे काम सुरू आहे. नेतृत्व निर्माण करणारी संघटना मक्ते घेऊ लागली आहे. यावर वस्तुनिष्ठ भाष्य...
आधे इधर जाओ... आधे उधर चलो...
रयत संघटनेचे तीन तेरा; म्हणे, आम्ही विचारधारेचे पाईक
पराग शेणोलकर
कराड-
विधानसभेच्या निवडणुकीत कराड तालुक्यासह पाटण तालुक्यातील राजकारणात आमचाच बोलबाला अशा पध्दतीने रयत संघटनेची वाटचाल सुरू आहे. मात्र, स्व. विलासकाकांची रयत संघटना म्हणजे तळागाळातील नेतृत्व तयार करणारी संघटना. ही संघटना मक्ते केंव्हापासून घ्यायला लागली? असा प्रश्न नव्याने उपस्थित झाला आहे. सध्या रयत संघटनेच्या भुमिकेकडे पाहिल्यांनतर शोल सिनिमाची आठवण झाली. "आधे इधर जाओ.. आधे उधर चलो.. बाकी मेरे पिछे आओ"... अशा भूमिकेतील सिनेेकलाकार आसरानी यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. संभ्रमात असलेला खरा निष्ठावंत काकाप्रेमी मात्र या प्रक्रीयेतून बाजूला उभा राहून संघटनेचा तमाशा बारकाईने पाहताना दिसत आहे.
त्याचे झाले असे की, सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाटण तालुक्यात काय होणार याची उत्सुकता दिल्लीपासून गल्लीपर्यंत आहे. कराड तालुक्याचा घेरा मोठा. त्यामुळे कराडउत्तर आणि कराडदक्षिण असे दोन मतदारसंघ. तर शिंदे सरकारच्या निर्मीतीत मोठी भूमिका बजावणारा पाटण तालुका. कराड उत्तरेत माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील विरूध्द भाजपाचे मनोज घोरपडे, कराड दक्षिणेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण विरूध्द भाजपाचे अतुल भोसले तर पाटणमध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या विरूध्द सत्यजित पाटणकर अशी समोरासमोरची लढाई होत आहे. या लढाईत स्वर्गीय विलासकाकांच्या रयत संघटनेची मोठी भूमिका असल्याचा सध्या बोलबाला आहे. तो किती खरा आणि खोटा हा संशोधनाचाच विषय.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील अॅड. उदयसिंह पाटील यांचा पराभव जिव्हारी लागलेल्या रयत संघटने थेट मनोज घोरपडे यांचा झेंडा हाती घेतला. तर पाटण विधानसभा मतदारसंघात रयतचे सैन्य शंभूराज देसाई यांच्या सैन्यात सामिल झाले आहे. आणि स्वतः संघटना प्रमुख अॅड. उदयसिंह पाटील कराड दक्षिणेत पुरोगामी विचार व काँग्रेसी विचारधारा सांगत पृथ्वीराज बाबांसाठी मतांचा जोगवा मागताना दिसत आहेत.
संघटनेची भूमिका काकाप्रेमींना रूचलेली नाही...
रयत संघटना व उदयसिंहदादांची ही भुमिका निष्ठावंत काकाप्रेमींना रूचलेली दिसत नाही. मोठ्या निवडणुका आल्या की, रयत संघटनेचा इथे प्रभाव, तिथे प्रभाव अशा बातम्या छापून घ्याव्या लागतात याचा नेमका हेतू काय? असा प्रश्न निर्माण झालाय. संघटना एवढी प्रभवशाली आहे तर स्वतःचे उमेदवार का उभे करत नाही. ऐके काळी नेतृत्व निर्माण संघटना म्हणून रयत संघटनेकडे संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. मात्र, सध्या नुसते रयत संघटना प्रभावाची दवंडी पिटताना दिसते. या मागचा हेतू का? याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. नेतृत्व तयार करणारांनी मक्ता घ्यायला केंव्हापासून सुरूवात केली.
कुटुंब चुकत नसतं...
कुटुंब कधीच चुकत नसत कुटुंब प्रमुख चुकतो. प्रमुख चुकल्यामुुळे कुटुंबाला वैफल्याचे दिवस येतात. प्रत्येकाला आपल्या जबाबदारीचे भान असते. एखाद्या छपराची मुख्य मेढ हालली की मग संपूर्ण छप्परच डळमळीत होत. त्यासाठी मुख्यमेढच जबाबदार असते. त्यामुळे कुटुंबच चुकले अस होत नाही. रयत संघटनेत इन कमिंग काय? वर्षानुवर्ष पोसलेले तेच ते कार्यकर्ते. रयत संघटनेची भीती घालण्याचे धंदे कितीदिवस चालणार? संघटने गुणवत्तेला आवकळा. संघटनेत योग्य फेरबदलांची उपाय योजना कधी केली जाते का? नव्या कार्यकत्यार्ंना संघटनेत आणले जाते का? रयत संघटना रयत संघटना हा बाऊ किती दिवस चालणार.
तिरंगी भूमिका काय कामाची?
नेत्याचा आदेश आला म्हणून फुकट पदे मिळवलेल्या पदाधिकार्यांनी पळणे म्हणजे संघटनेने मोठे दिव्य हाती घेतले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. संघटनेचे समाजात स्थान काय? समाजाला संघटनेची भूमिका कितपत पटते आणि रयत संघटनेचा आवाका किती राहिला आहे याचे मुल्यमापन न करता जर वेळेला कोणाला तरी टार्गेट करायच पाठिंबा द्यायचा हा काय प्रकार आहे. आणि असे करण्याचा पड्द्यामागण्या गोष्टी काय आहेत. ही भूमिका विचारधारेला अनुसरून आहे का? एका विभागात वेगळा निर्णय, दुसर्या विभागात दुसरा निर्णय, तिसर्या विभागात भलताच निर्णय असली तिरंगी भूमिका काय कामाची असे ही काकाप्रेमी बोलू लागले आहेत.
बाजारू मार्केटींग..
विलासकाका हे पुरोगामी विचारांचे काँग्रेस विचारधारेचे पाईक. आणि विलासकाकांचा लोगो आज भाजपाच्या बॅनरवर दिसतो. भाजपात विलासकाकांचे अनेक मित्र होते. मात्र, त्याची तमा न बाळगता त्यांनी भाजपावर नेहमीच टीका केली. त्या काकांचा फोटो आज कराडउत्तर विधानसभा मतदारसंघाच्या बॅनरवर जाणे ही र्दुदैवी गोष्ट आहे. काकांनी रयत संघटना धनदांडग्यांच्या दावणीला कधी बांधली नाही. काकांची ही लढाई विचारांची, तत्वाचीं होती. निवडणूका आल्या की रयत संघटनेचा या मतदार संघावर प्रभाव त्या मतदारसंघावर प्रभाव अशा बातक्या पेरणे याला बाजारू मार्केटींग म्हंटलेवर वावगे ठरणार नाही.
परिणामी ....
आज रयत संघटनेची अवस्था "आधे इधर जाओ... आधे उधर चलो... बाकी मेरे पिछे आओ"... अशी झाली आहे. अशा भूमिकेमुळे काकाप्रेमी निष्ठावंतांनी संघटनेची कास सोडली आहे. संघटनेच्या नावाखाली कोणी आम्हाला ग्रहित धरू नये, असे निष्ठावंत सांगत आहेत. या निवडणुकीत आम्ही आमची भूमिका घेण्यासाठी समर्थ असल्याचेही ते सांगतात. त्यामुळे कोणी कितीही दावा केलातरी वास्तविक चित्र मात्र वगळे आहे. 'दक्षिणेत तर म्हातार्या बैल संभाळण्यापेक्षा लंबी रेंस का घोडा' असलेल्या तरूण नेतृत्वाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे काकाप्रेमी खासगीत मत नोेंदवत आहेत. तर अनेकांनी काम सुरू केल्याचे दिसते.
©2024. All Rights Reserved.