ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
एमआयडीसी विरोधात उत्तर कोरेगाव तालुक्यामधील काही गावांमध्ये जनता येणार रस्त्यावर.
  • मुकुंदराज काकडे
  • Wed 24th Aug 2022 05:39 am

उत्तर कोरेगाव तालुक्यामधील एमआयडीसीच्या अनेक प्रश्नांबाबत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा १ सप्टेंबर रोजी उत्तर कोरेगाव तालुक्यामधील सोळशी, नांदवळ, पिंपोडे बुद्रुक, भावेनगर असा दौरा आयोजित केला असून यामध्ये शेतकऱ्यांच्या मनाविरोधात कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

वाठार स्टेशन :  प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यात एमआयडीसी मंजूर झाली असून ही एमआयडीसी उत्तर कोरेगाव तालुक्यातील काही भागात होणार असल्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाल्यापासून मोठ्या प्रमाणावर या भागात पैसेवाल्या धन-दांडग्यांनी लक्ष घातल्याचे चित्र दिसून येत आहे याच माध्यमातून उत्तर कोरेगाव तालुक्यात एमआयडीसी मंजूर झाल्यापासून काही गावात या एमआयडीसीच्या विरोधात बैठका सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रामुख्याने उत्तर कोरेगाव तालुक्यातील मोठे गाव असणारे पिंपोडे बुद्रुक येथे एमआयडीसी विरोधात बैठका तसेच ग्रामसभा ही घेण्यात आली. याच माध्यमातून उत्तर कोरेगाव तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या सोळशी येथेही ग्रामस्थांचा एमआयडीसी विरोधात उद्रेक पाहावयास मिळत आहे तसे पाहिले तर दलालांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याचे काम धनदांडग्या व नेतेमंडळी मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र देखील पहावयास मिळत आहे
या उत्तर कोरेगाव तालुक्यात होत असलेल्या एमआयडीसी विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचे शिवसेना कोरेगाव तालुकाप्रमुख संतोष सोळस्कर यांनी सांगितले ते पुढे म्हणाले शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कटिबद्ध असणारी शिवसेना या एमआयडीसी विरोधात सर्वात मोठा लढा उभारणार असून सरकारने जी एमआयडीसी या उत्तर कोरेगाव तालुक्यात मंजूर केलेली आहे व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम हे आताचे सरकार करत असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका संशयास्पद दिसत असून हात ओला तर मैतर भला अशी भूमिका राष्ट्रवादी घेत आहे. हे जोपर्यंत थांबणार नाही तो पर्यंत शिवसेना आपले उभे केलेले आंदोलन थांबवणार नाही यावर लवकरच गावोगावी बैठका घेऊन एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, संपर्कनेते नितीन बानगुडे पाटील सर, उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांच्या माध्यमातून भेटणार आहोत असेही कोरेगाव तालुकाप्रमुख संतोष सोळस्कर यांनी सांगितले.
              परंतु हा उभारलेला लढा कितपत यशस्वी होईल व सरकार अजून कोणता निर्णय घेईल हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.



©2026. All Rights Reserved.