ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
.आमचे ढोल वाजवायचे सोडा सातारकरांनी तुमचा ढोल चांगलाच बडवला आहे...खा.उदयनराजेंनी आ.शिवेंद्रराजेंना सुनावले..
  • प्रकाश शिंदे
  • Sat 1st Oct 2022 03:28 pm

सातारा - सातारकरांना विकास हवा आहे.पंपिंगचा खर्च करुन नव्हे तर गुरुत्वाकर्षण पध्दतीने पाणी हवे आहे.पेन्शनर्स सिटी ही सातारची ओळख पुसायची आहे. एकछत्री स्वार्थी कारभार करणारे आणि संस्था, बँका मोडून खाणारे सातारकरांना नको आहेत.आमचे ढोल वाजवायचे सोडा, पण सातारकरांनी तुमचा ढोल जो चांगलाच बडवला आहे त्याचा विचार करा. सातारकरांच्या नावाखाली वेड पांघरुन पेडगांवला जाणारे किती दिडशहाणे आहेत हे सातारकरांना आता समजुन चुकले आहे असा घणाघात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी टिकाकारांवर नांव न घेता केला.
आदरणीय स्वर्गीय काकांच्या माघारी टिका न करता, आपलं काम करत राहयचं असं ठरवलेले होते.परंत यांचे येरे माझ्या मागल्या सुरु झाल्याने आम्हाला बोलाव लागतंय असे नमुद करुन, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, पोवईनाका येथे ग्रेडसेपरेटर पाहीजे अशी मागणी सातारकरांची तसेच अनेक संस्था संघटनांनी केली होती. ती मागणी सर्वाच्या सहकार्याने आम्ही पुरी केली. ग्रेडसेपरेटरच्या उद्घाटन मुहूर्ताची वाट न बघता आम्ही तो जनतेसाठी खुला करायला लावला. त्यांनतर तत्कालीन पालक मंत्री यांच्या हस्ते ग्रेडसेपरेटरचे उद्घाटन झाले त्यावेळी आज सातारकरांच्या आडून टिका करणारे संधीसाधु उदघाटनाला पुढे-पुढे करत होते. हे दुटप्पी ढोंग आहे असा पलटवार देखिल केला आहे.ग्रेडसेपरेटरचे काम फसलेले नाही तर श्रेय लाटण्यात माहीर असतानाही तुमची येथे फसगत झाली आहे हे तुमचे खरे अवघड जागीचे दुखणे आहे. आज श्रेय तुम्हाला मिळत नाही म्हणून खीन्न् होवू नका, खरे श्रेय विकासाचा ध्यास असणा-या सातारकरांचे आहे.पोवईनाक्यावर अनेकजण बसतात.त्यापैकी बनकर एक असतीलही किंवा नसतीलही, परंतु सर्वेक्षण शासनपातळीवर झाले आहे.आमच्या माहीतीप्रमाणे बनकर त्यांना खुप घाबरतात.परंतु येथे तर उलट दिसतेय, त्यांनीच बनकरांचा धसका खाल्लेला दिसतोय. हे नवल आहे. आज अपवाद बगळता सर्व बसेस ग्रेडसेपरेटरमधुनच जात आहेत. पोवईनाक्यावरील वाहतुकीची समस्या निश्चितच संपुष्टात आलेली आहे. वाहतुकीच्या ऐन भरात देखिल पोवईनाक्यावर कोंडी होत नाही ही वस्तुस्थिती आहे. उगाच तोंडाची वाफ दवडून, आपले अधिक हसे करुन घेवू नका असे सडेतोड बोल देखिल सुनावले आहेत.सातारचा ग्रेडसेपरेटर तांत्रिक व्यावहारिक दृष्टया परिपूर्ण आहे. त्याचा वापरही चांगला होत आहे, होणार आहे. सातारच्या विकासातील मैलाचा दगड (माईल स्टोन) म्हणून डसेपरेटर कडे सातारकर बघत आहेत. आम्ही काम करत राहणारे आहोत. निवडणुकीतील मतांपेक्षा विचारांचे मत आम्हास महत्वपूर्ण आहे.चांगल्या विचारांची पाठराखण सातारकरांनी आजपर्यंत केली आहे. स्वार्थी विचारांना ते थारा देत नाहीत हा अनुभव आहे. त्यामुळे निवडणुकीत सातारकर जे करतील ते योग्यच करतील, ते आम्हास शिरसावंदय असेल,सातारकरांच्या विकासाकरीता तुम्ही आजपर्यंत काय केले हे आधी सांगा, तत्वज्ञ नसतानाही दुस-यास सांगे तत्वज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण अशी तुमची अवस्था आहे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शेवटी नमुद केले आहे.



©2026. All Rights Reserved.