मलवडी : मलवडी, येथील रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज व महाराष्ट्र शासन महसूल विभाग उप विभागीय कार्यालय दहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबीरामध्ये ५५० जणांची तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्य तपासणी शिबीरामध्ये दंत तज्ज्ञ डॉ. सौरभ साळुंखे, नेत्र तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता पाटील, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. जितेंद्र तिवाटणे, डॉ. शीतल तिवाटणे, माधव बागच्या हृदय रोग तज्ज्ञ डॉ. मधुमती सापकर यांनी शिबीरार्थींची तपासणी करून मार्गदर्शन केले.
शिबीर उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश साळुंखे म्हणाले, सर्वांचे आरोग्य सदैव निरोगी राहण्यासाठी नियमित तपासणी व वेळेवर उपचार आवश्यक असून आमचे विद्यार्थी, पालक, शिक्षक अशां सर्वांमध्ये आरोग्य विषयक जागृती व त्यांच्या आरोग्यविषयक समस्यांवर मार्गदर्शन करून सुदृढ समाज निर्माण करणे हा आरोग्य शिबीर आयोजनाचा उद्देश आहे.
या प्रसंगी बोलताना माण - खटावचे उपविभागीय अधिकारी श्री. शैलेश सुर्यवंशी म्हणाले, "म. गांधी जयंत्ती दिवशी सेवा पंधरवडा समारोपाचा कार्यक्रम म्हणून आरोग्य शिबीर आयोजित केले असून शिबीरार्थींना दिलेल्या सेवेबद्दल तज्ज्ञ डॉक्टर्स व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन!"
शिबीरामध्ये सहभागी महिला व विद्यार्थीनींना स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. जितेंद्र तिवाटणे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हनुमंत कायंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भक्ती पाटील व प्रा. प्रियंका पाटील यांनी केले तर आभार प्रा. सुजाता पाटील यांनी मानले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. ए. जे. बरकडे, उपप्राचार्या नंदिनी साळुंखे, कार्यालय अधिक्षक केशव औटे, प्रा. विक्रम लांडगे, डॉ. एस. एस. लेकुरवाळे, एन. सी. सी. चे कॅडेटस, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रा. एन. एस. गव्हाळे व प्रा. एस. एस. धनावडे यांनी तांत्रिक सहाय्य केले.
©2025. All Rights Reserved.