वाई : कोणत्याही परीक्षेत शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी हे त्या शाळेचे व गावाचे भूषण असतात तसेच त्यांना शिकवणारे शिक्षक हे सुध्दा शाळेसाठी गौरवास पात्र असतातअसे मनोगत कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या कळंभे गावच्या ग्रामपंचायत सदस्या व शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ सारीकाताई संजय गायकवाड यांनी कळंभे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यक्रमात मुलांना मार्गदर्शन करताना मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात कळंभे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील महासंघ आयोजित राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत कु आदीत्य गायकवाड याने सातारा केदांत प्रथम क्रमांक मिळवला व वाई तालुका प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवल्यामुळे तसेच सन 2021 -2022या शैक्षणिक वर्षात जि .प . प्राथ . शाळा कळंभे येथील इ. ३री व 4 थी मधील सर्व विद्यार्थी एकून पाच स्पर्धा परीक्षांना बसते होते व सर्व परीक्षामध्ये कौतुकांस्पद यश संपादन केले अशा सर्व विद्यार्थी यांचा सत्कार यावेळी सौ सारीकाताई गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सौ सारीकाताई गायकवाड म्हणाल्या की टिव्ही वर मालिका आणि हातातला मोबाईल यामुळे प्रत्येकाचे आयुष्य गुरफटून गेले आहे याचा परिणाम कुंटूबांबरोबर विद्यार्धाच्या आयुष्यावर मोठया प्रमाणावर झालाय हीच बाब लक्षात घेऊन ( सांगली जिल्हयातील ) कडेगाव तालुक्यातील मोहीतेच्या वडगाव येथे दररोज एक तास सायंकाळी ७ ते ८ पर्यत विद्यार्थी सह घरातल्या सर्वांचे मोबाईल व टिव्ही बंद करून मुलांच्या अभ्यासासाठी हा वेळ राखीव ठेवला आहे शिवाय ते बंद ठेवण्यासाठी भोंग्याच्या माध्यमातून सर्व गावात चौकाचौकात आठवण करून दिली जात आहे हे गाव आहे ( सांगली ) जिल्हयातील कडेगाव तालुक्यातील वडगाव (एक आदर्श गाव )असा उपक्रम प्रत्येक गावाने राबवल्यास हा उपक्रम आदर्श ठरेल अशी भावना भावी सरपंच सौ सारीकाताई गायकवाड यांनी व्यक्त केली आहे त्या फुढे म्हणाल्या की शाळेचा पाया शिक्षकांच्या शिकवणी वर अवलंबून असतो त्यांच्यामुळेच सर्व विद्यार्थी शिक्षणाचे धडे चांगल्या प्रकारे त्यांच्याकडूनच शिकत असतात अशा शब्दात सर्व शिक्षकांचे गोडकौतुक ही सौ सारीकाताई यांनी कळंभे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थांच्या सत्कार कार्यक्रमांत मुलांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी कार्यक्रमास ग्रामपंचायत उपसरपंच श्री प्रकाश बाबर ग्रामपंचायत सदस्या सौ नीलम शिवथरे शिक्षणतज्ज्ञ श्री रमेश वाघमारे मुख्याध्यापीका सौ विनया पवार मॅडम सौ सविता निंबाळकर मॅडम श्री राजेंद्र जाधव सर श्री सुरेश जगदाळे सर व शाळा व्यवस्थापन समिती च्या अध्यक्षा सौ अश्विनी वाघ उपाध्यक्ष सौ निवेदिता सुतार श्री अमरजीत गायकवाड श्री बापू वाघ सौ दिपाली शिवथरे सौ नजराना मुलाणी सौ कल्याणी शिवथरे मुलांचे पालक तसेच ग्रामंस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री जाधव सर यांनी केले व सौ निंबाळकर मॅडम यांनी आभार मानले .
©2026. All Rights Reserved.