पाचगणी : सायघर, ता. जावळी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मयूर धनावडे याची राष्ट्रीय हॉकी संघात निवड झाली आहे. मयूर धनावडे याचे प्राथमिक शिक्षण सायघर येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. चौथीमध्ये असताना सातारा येथे त्याने रनिंग स्पर्धेत सहभाग घेतला. त्याची राज्यस्तरीय संघात निवड होऊन त्याचे त्यापुढील शिक्षण क्रीडा प्रबोधनी पुणे येथे झाले.

राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा संघात त्याची निवड झाली असून प्रशिक्षक अजित लकडा यांचे प्रशिक्षण लाभले आहे. २०१९ मध्ये औरंगाबाद ज्युनियर हॉकी स्पर्धेत खेळला त्यानंतर २०२१ चेन्नई येथे तर २०२२ मध्ये ऑल इंडिया टुर्नामेंट पुणे येथे त्याला गोल्ड मिडल मिळाले. आतापर्यंत त्याने खेलो इंडिया टुर्नामेंट बेंगलोर, सिनियर नॅशनल भोपाळ, नॅशनल गेम गुजरात आदी ठिकाणच्या हॉकी स्पर्धात खेळला आहे. निवडीबद्दल झाल्याबद्दल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, आर. के. धनावडे, आदींनी केले आहे
©2026. All Rights Reserved.