पुसेगाव : पुढील काळात वर्धनी मातेच्या यात्रेनिमित्त परंपरेने चालत आलेले कुस्ती मैदान काही काळापूर्वी बंद पडले होते परंतु यावर्षी गावातील ग्रामस्थ व पैलवान मंडळीने पुन्हा या मैदानाला नवीनतेने सुरू केले असून,पुढील काळात या वर्धनी माता यात्रेचे मोठे मैदान असेल असे प्रतिपादन पैलवान दत्तात्रय मदने जिल्हा संघटक कुस्ती मल्लविद्या महासंघ सातारा यांनी केले आहे.
. पैलवान दत्तात्रय मदने म्हणाले माझे गाव मूळ वर्धनगड गावचा असून मला माझ्या गावाबद्दल अभिमान आहे. आज या ठिकाणी कृष्णा जाधव व कल्याण जाधव,पैलवान अण्णा चव्हाण यांनी कुस्त्याचे मैदान भरवून कुस्त्याची सुरुवात केली आहे. त्यास आपण सहकार्य करून पुढील काळात वर्धनगड चा आखाडा नामांकित आखाडा असेल असे पैलवान दत्तात्रय यांनी आपला ठाम विश्वास व्यक्त केला आहे . यामध्ये तालुक्यातील अनेक पैलवानांनी भाग घेतलेला होता एक नंबरची कुस्ती, पैलवान महेश चव्हाण भांडारमाची, विरुद्ध पैलवान अक्षय जाधव साप, यांचे मध्ये झाली. या कुस्ती स्पर्धेचे समालोचन पैलवान रोहन केंजळे कटापूर हे करीत होते. हा कुस्ताचा आखाडा यशस्वी करण्यासाठी सरपंच अर्जुन मोहिते, माजी सोसायटीचे चेअरमन अर्जुन जाधव, ननावरे, पवारवाडी सरपंच महेश पवार, उमेश मोरे, जिल्हा संघटक कुस्ती मल्लविद्या महासंघ पैलवान दत्तात्रय मध्ये, इंग्लिश सहकार्य केले.
©2026. All Rights Reserved.