या कार्यक्रमात माणदेश फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बाबर, मध्य रेल्वेचे ज्युनिअर इंजिनिअर कौस्तुभ बाबर, गुगल सन्मानित शिक्षक बालाजी जाधव, सागर बाबर, देवापूर पळसावडे विकास सेवा सोसायटी चे चेअरमन रावसाहेब बाबर, पत्रकार महेश कांबळे, पत्रकार विशाल माने , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ इंदिरा नरळे, रामचंद्र पवार, अमोल नरळे, अमोल काळेल, अभिमन्यू नरळे, अशोक पवार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
माण : माण तालुक्यातील म्हसवडनजिक विजयनगर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना माणदेश फाऊंडेशनच्या वतीने शालेय साहित्य वितरित करण्यात आले.या शाळेत परिसरातील मोलमजुरी करण्याऱ्या गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्य देण्यास पालक हतबल ठरतात. त्या अनुषंगाने या शाळेत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून शाळेतील मुलांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, वह्या, कंपास, कंपास साहित्य, पेन्सिलपाट्या, स्केच पेन इत्यादी साहित्याचे वितरण करण्यात आले.यासाठी कसबा पेठ पुणेचे विद्यमान नगरसेवक रवींद्र धंगेकर, माणदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शिका अनुराधा देशमुख, प्रवीण काळे, यशवंत काळे, सुनील बाबर, विजय पिसे, अशोक माने यांचे सहकार्य लाभले.यावेळी सुनील बाबर उपस्थितांना म्हणाले की, या भागातील गरजू मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून प्रोत्साहन देण्यासाठी माणदेश फाउंडेशन च्या माध्यमातुन लोकसहभागातून ही चळवळ उभी केली असून आगामी काळात गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ही चळवळ आणखी व्यापक करण्याचा माणदेश फाउंडेशनचा मानस असल्याचे सांगितले.तसेच मध्य रेल्वेचे ज्युनिअर इंजिनिअर कौस्तुभ बाबर म्हणाले की माण सारख्या दुष्काळी भागात गुगल ने सन्मानित केलेले बालाजी जाधव यांच्या सारखे शिक्षक कार्यरत असणे ही अभिमानाची बाब असून पाठ्य पुस्तकां बरोबरच व्यावसायिक शिक्षणाचे धडे या जिल्हा परीषद शाळेत मिळतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बालाजी जाधव यांनी घेतलेले कष्ट वाखाणण्याजोगे असून त्यांनी हाती घेतलेले हे कार्य अविरतपने सुरु ठेवावे असे ते उपस्थितांसमोर म्हणाले.यावेळी उपस्थित पत्रकार विशाल माने, पत्रकार महेश कांबळे यांनी जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक कार्याची महती स्पष्ट केली. तर उपस्थितांचे गुगल सन्मानित शिक्षक बालाजी जाधव यांनी आभार मानले.या कार्यक्रमात माणदेश फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील बाबर, मध्य रेल्वेचे ज्युनिअर इंजिनिअर कौस्तुभ बाबर, गुगल सन्मानित शिक्षक बालाजी जाधव, सागर बाबर, देवापूर पळसावडे विकास सेवा सोसायटी चे चेअरमन रावसाहेब बाबर, पत्रकार महेश कांबळे, पत्रकार विशाल माने , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ इंदिरा नरळे, रामचंद्र पवार, अमोल नरळे, अमोल काळेल, अभिमन्यू नरळे, अशोक पवार व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
©2026. All Rights Reserved.