उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित वाई ची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक २४ सप्टेंबर २०२२ रोजी कृष्णोत्सव मंगल कार्यालय येथे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत संपन्न झाली. संस्थेचे संस्थापक कै आनंद कोल्हापुरे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित ज्येष्ठ सभासदांच्या हस्ते करून सभेची सुरवात करणेत आली. संस्थेचे अध्यक्ष श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी प्रास्ताविक केले. विषय पत्रिकेचे वाचन अध्यक्ष अनुराधा कोल्हापुरे , संचालक श्री रमेश यादव, श्री मदनकुमार साळवेकर, श्री अमर कोल्हापुरे, अशोक शिंदे, मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार, अधिकारी सौ शिवानी पावशे यांनी केले. संचालक मंडळाने सर्व सभासदांसाठी १२% लाभांश ची शिफारस केली होती ,
मात्र सभासदांच्या आग्रहास्तव संचालक मंडळांनी १३% लाभान्श जाहीर केला व याबाबत सभासदांनी समाधान व्यक्त केले. कोरोनामुळे उत्कर्ष ची १५% लाभांश देण्याची परंपरा खंडित झाली, मात्र यापुढील काळात १५% लाभांश देण्यासाठी आम्ही कायम आग्रही राहू असे मत सर्व संचालक मंडळांनी व्यक्त केले.
तसेच उत्कर्ष पतसंस्थेने किसनवीर महाविद्यालय याच्या माध्यमातून तरूणांकरिता बँकिंग सर्टिफिकेट कोर्स सुरु केला असून याचे प्रत्यक्ष ज्ञान हे उत्कर्ष पतसंस्थेत दिले जाणार आहे, यामुळे तरुणांना बँकिंग क्षेत्रातील एक चांगला अनुभव मिळणार असून त्याचा फायदा नोकरीसाठी देखील होणार आहे, सभासद वैभव ढगे यांनी या योजनेचे विशेष कौतुक केले. सभासदांसाठी विमा काढण्याचा प्रस्ताव देखील सभासदांकडून आला, त्यावर सविस्तर विचार विनिमय करून सभासदांना नक्कीच चांगली एखादी योजना सुरु करू अशी ग्वाही अध्यक्ष यांनी दिली. संस्थेचे ज्येष्ठ सभासद श्री बाळकृष्ण वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या पारदर्शक कारभाराबाबत सर्व संचालकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या ५ कर्जदार याना आदर्श कर्जदार या पुरस्काराने सन्मानित करणेत आले. तसेच संस्थेचे सेवक श्री जयदीप कांबळे यांनी एका ग्राहकाचे सोन्याचे ऐवज लॉकर्स मध्ये चुकून राहिले होते,
ते प्रामाणिकपणे त्या ग्राहकास सुपूर्त केले या कार्याबद्दल प्रामाणिक कर्मचारी म्हणून त्यांचा सन्मान करणेत आला. संस्थेचे कर्मचारी श्री हेमंत करंजे यांनी सर्व संचालक यांच्या प्रति कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले.
संस्थेचे सभासद श्री अविनाश जोशी, श्री जयवंत पवार, श्री राहुल तांबोळी, श्री जगन्नाथ मोहिते, श्री अशोक मांढरे, श्री धनंजय पानसे, श्री रामचंद्र कानडे, श्री बाळासाहेब कोठावळे, श्री अनिल पटवर्धन,श्री अतुल भाटे, श्री प्रतापराव शिंदे, श्री शरद भगत, श्री बाळकृष्ण वाघ, श्री नीतीराज बाबर, श्री निलेश पवार, श्री वैभव ढगे, श्री मारुती भिसे, श्री श्रीपाद कुलकर्णी, श्री संदीप पिसाळ, वृषाली चव्हाण इत्यादींनी चर्चेत सहभाग घेतला. सभेचे आभार उपाध्यक्ष श्री राजेंद्र धुमाळ यांनी व्यक्त केले. या सभेस उत्कर्ष पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, उपाध्यक्ष श्री राजेंद्र धुमाळ, संचालक श्री मदनकुमार साळवेकर, श्री रमेश यादव , डॉ मंगला अहिवळे, श्री अमर कोल्हापुरे, श्री अशोक शिंदे, श्री आनंदराव कांबळे, श्री श्रीकांत शिंदे, मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार, उत्कर्ष पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व सेवक वृंद उपस्थित होते
©2025. All Rights Reserved.