(अप्पर जिल्हा व सत्र न्यायालय कराड यांचा निकाल; कर्तव्यदक्ष सपोनि अजय गोरड यांच्या तपासाला यश
अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून अपहरण करून तिच्याशी लैंगिक संबंध ठेवल्याच्या आरोपावरून अंधारवाडी(आनंदपुर), ता कराड येथील अधिक गोविंद जाधव( वय-३० वर्ष) या युवकास अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाने वीस वर्ष कारावास व १६०००/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे उंब्रज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांच्या तपासाला यश आले असून उंब्रज पोलिसांच्या लौकिकात आणखी भर पडली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, दिनांक ०९-१०-२०२० रोजी १२.३० च्या सुमारास उंब्रज ता कराड गावच्या हद्दीतील महात्मा गांधी हायस्कूल समोरून एका अल्पवयीन मुलीस ती शाळेत मिळणारे तांदूळ घेऊन जाण्यासाठी तिच्या अल्पवयीन चुलत भावासोबत जात असताना ती झेरॉक्स काढून येते असे त्यास सांगून गेली ती परत आली नाही. याबाबत फिर्यादीने दिलेल्या पुरवणी जबाबानुसार त्यांच्या अल्पवयीन मुलीस अधिक गोविंद जाधव रा अंधारवाडी (आनंदपुर)ता.कराड याने मोबाईल फोनवरून तिच्याशी संपर्क साधत तिला लग्नाचे आमिष दाखवून तिला तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून फूस लावून तिचे अपहरण करून तिच्याशी लैंगिक संबंध केल्याबाबत प्राप्त फिर्यादीवरून उंब्रज पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ४१५/२०२० भादंविस. क. ३६३,३६६,३७६(२)(एन) सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम सन २०१२ चे कलम ४,६,८,१२(एल) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार, पोलीस हेड कॉन्स्टेबल फिरोज शेख, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत पाटील यांनी कसोशीने करून आरोपीचा शोध घेत त्यास गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथून पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख व पथकाने ताब्यात घेतले होते. आरोपीस न्यायालयात हजर केले करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावे न्यायालय सादर केले होते व दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचा खटला मा अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीशसो कराड, श्रीमती होरे मॅडम यांच्या न्यायालयात चालला होता. खटल्याचे कामकाज जिल्हा सरकारी वकील आर सी शहा यांनी पाहिले. सदर केसमध्ये ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदार,पंचांच्या साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून मा न्यायाधीश साहेब यांनी ग्राह्य धरून आरोपीस सदर शिक्षा ठोठावली आहे. तसेच उंब्रज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड त्यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलिसांनी कसोशीने तपास करून मा न्यायालयात योग्य दोषारोपपत्र दाखल करून पुरावे योग्य पद्धतीने सादर केल्यामुळे उंब्रज पोलिसांच्या लौकिकात आणखी भर पडली आहे. दरम्यान, सदर खटल्यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ श्री रणजीत पाटील, उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद पाटील, प्रकाश कार्वेकर यांनी योग्य ती मदत केली.
पोलीस निरीक्षक अजय गोरड यांचे आवाहन. ..
शासनाने मुली व बालकांचे संरक्षण करणारा पोक्सो कायदा अधिक कडक केला आहे. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेणे, अत्याचार करणे, पाठलाग करणे,शाळकरी मुलींना त्रास देणे आदि रोडरोमिओंना महागात पडणार आहे. या कायद्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा होणार आहे. त्यामुळे सर्वांनी कायद्याचा आदर करीत आपले वर्तन चांगले ठेवावे.
सपोनि अजय गोरड..
©2026. All Rights Reserved.