फलटण : महिला ग्रामसेविकेला मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर फरारी झालेल्या ग्रामसेवकास जिल्हा परिषद सातारा यांनी निलंबित केल्यानंतर दिनांक ३१ रोजी जामीन मंजूर झाल्यानंतर पुन्हा फिर्यादी ग्रामसेविकाला व त्यांच्या पतीला ग्रामसेवकाने कोयत्याने मारहाण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार व फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 31 रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास जामीनावर सुटलेला निलंबित ग्रामसेवक राजाराम शंकर ढोक (राहणार लक्ष्मी नगर फलटण तालुका फलटण) यांने गौरीशंकर आपारमेंट शेजारी गोळीबार मैदान विद्यानगर फलटण येथे रोडवर फिर्यादी ग्रामसेविका त्यांच्या पतीसोबत पाहुण्याकडे जात असताना निलंबित ग्रामसेवक याने शिवीगाळ करत महिला ग्रामसेवक व त्याच्या पती यांना धक्काबुक्की करून माझ्यावरती केलेली केस काढून घ्या नाहीतर तुम्हाला कोयत्याने जिवे मारीन अशी धमकी दिली याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात ग्रामसेवक राजाराम शंकर ढोक यांच्या विरोधात महिला ग्रामसेविकेचा पती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण ग्रामीण पोलीसांनी याप्रकरणी न्यायालयात 354 ब हे वाढीव कलम लावून न्यायालयात निलंबित ग्रामसेवक ढोक याचा जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. निलंबित ग्रामसेवक याने पहिल्या दाखल गुन्ह्यात जामीन मंजूर झाल्यानंतर त्याच दिवशी शिवीगाळ करत महिला ग्रामसेवक व त्याच्या पती यांना कोयता हातात घेऊन धक्काबुक्की करून मारहाण करूनही शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून सदर प्रकरणात दखलपात्र गुन्हा दाखल होण्याची आवश्यकता असताना तो न झाल्याने फिर्यादी ग्रामसेविकेच्या पती यांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत न्यायालयात व महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले आहे.
©2026. All Rights Reserved.