ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड ३६२ मशालींमुळे उजळून निघाला
  • प्रकाश शिंदे
  • Fri 30th Sep 2022 02:29 am

प्रतापगड ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड ३६२ मशालींमुळे उजळून निघाला. प्रतापगडा वरील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ ,सातारा महाबळेश्वर,पुण्यातील व महाड रायगड येथील शिवभक्तांच्या वतीने भवानी मातेच्या मंदिरास ३६२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
नवरात्रोत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्त प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद घेत असतात. हा मशाल महोत्सव धुक्याच्या काळोखात  संपन्न झाला.३६२ मशाली धुक्यात ह्ररवल्याचेही दिसून आले.प्रतापगडा वरील भवानी मातेच्या मंदिरास ३६२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव आयोजित करण्यात आला होता.राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून या मशाल महोत्सवाचा आनंद लुटला. हा तेजोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रातील प्रतापगड,महाबळेश्वर,सातारा,पुणे,कोल्हापूर,सांगली आदी विविध भागांमधून हजारो भाविकांनी तरुणांनी प्रतापगडावर हजेरी लावली.
नवरात्री पूर्वी पंधरा दिवस आधीपासून या महोत्सवाच्या तयारीचे काम सुरु होते. असंख्य लोक या कामात आपला खारीचा वाटा उचलतात. प्रतापगडावर प्रेम करणारे अनेक शिवभक्त या कार्यक्रमात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात मदत करतात. मशाल महोत्सवासाठी लागणाऱ्या मशाली तसेच इतर साहित्याची तयारी गडावर जोरात सुरु होती.यासाठी प्रतापगड परिसरासह सातारा,पुणे,कोल्हापूर जिल्ह्यातून कार्यकर्ते गडावर पोहोचतात.गुरुवारी दिवसभर या कार्यक्रमाची तयारी सुरु होती.
 भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय’ च्या जयघोष करून मशाली प्रज्वलित करत तुतारीचा नाद करत गड दणाणून निघाला.गडावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये बोचऱ्या थंडीतही मोठा उत्साह होता.

प्रतापगड किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भवानी माता मंदिरापासून बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड उजळून निघाला. या नयनरम्य नजाऱ्यामुळे जणू शिवकाळच अवतरला असल्याचा भास होत होता.रात्री आठच्या दरम्यान ढोल ताशांच्या गजरात जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. या वेळी नगारे, तुतारी, सनई तसेच प्रतापगडावरील प्रसिद्ध स्वराज्य ढोल ताशा पथक व लेझीमच्या गजरात व भगवे झेंडे फडकावत मशाली पेटून दीपोत्सव साजरा झाला. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांनी डोळ्यात साठवून ठेवला.



©2026. All Rights Reserved.