पुसेगाव : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे विविध प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून हजारो शिक्षक उपाशी पोटी बिगर वेतनाचे अध्यापनाचे कार्य करीत आहेत. महाविद्यालयीन महासंघाने प्रशासनाशी वारंवार चर्चा करून तसेच आंदोलन करून काही मागण्या मान्य करून घेतल्या आहेत. परंतु शासनाने अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाआहे. या संदर्भा अन्वये सातारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक बीबी पाटील यांचे अध्यक्षतेखाली व शिक्षक संघटनेचे विविध पदाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आज शिक्षक दिनी काळया फिती लावून, राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये संबंधित माननीय जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय शिक्षण मंत्री महोदयांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.आपल्या सातारा जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाचे विविध प्रश्नाचे निवारण करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी यांनी माननीय शिक्षण मंत्री महोदयांकडे महाविद्यालयीन कनिष्ठ शिक्षकांच्या वतीने निवेदन सादर करण्यासाठी निवेदनामार्फत जिल्हाधिकाऱ्याना विनंती केली आहे. कनिष्ठ महाविद्यालयिन शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी सहाय्यभूत व्हावे,अशीही मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या कडून करण्यात आलेले आहे. सदर या निवेदनात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाचे सचिव प्राध्यापक एनटी निकम, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. विलास खंडाईत, समन्वयक प्राचार्य दत्तात्रय बर्गे,महिला सदस्य प्रा. सौ नीलम देशमुख,प्रा. सौ पल्लवी भोसले, प्रा अरुणा कोरे, प्रा माधुरी चव्हाण, प्रा पद्मिनी मोकाशी, प्रा अरुणा लोंढे, उपाध्यक्ष प्रा. गणेश पाटील, प्रा गोविंद वाघ, प्रा एन जी जाधव, सहसचिव पी आर नलावडे, प्रा केदार होगळे, प्रा उदयराज माने तसेच सर्व निमंत्रित सदस्य सर्व तालुका अध्यक्ष यांची नावे या निवेदनावर आहेत.
©2026. All Rights Reserved.