ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन
  • Aavaj Daily Team
  • Wed 18th Jan 2023 06:17 am

पुणे : पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. 

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

पुणे : पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. 

आगमन झालेल्या  प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, जपान, अर्जेंटिना, जर्मनी या सदस्य देशांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर वित्तीय विकास आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता देण्यासाठी महत्वाच्या असलेल्या कोएलीशन फॉर डिझास्टर रेझीलीयंट इन्फ्रास्ट्रक्चर, इंटरनॅशनल फायनान्स कार्पोरेशन, युरोपियन युनियन, एशिअन डेव्हलपमेंट बँक या जागतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.

आगमनप्रसंगी या प्रतिनिधींचे पुणेरी पगडी घालून आणि शाल देऊन तसेच ढोल ताशाच्या गजरात आणि तूतारीच्या निनादात पारंपरिक पद्धतीने प्रशासनाच्यावतीने स्वागत करण्यात आले. 

स्वागतासाठी राजशिष्टाचार विभागाचे उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, पुणे महानगरपालिका उपायुक्त किशोरी शिंदे, विमानतळ संचालक संतोष ढोके, सहायक संचालक संजय दुलारे उपस्थित होते.

बैठकीसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी प्रशासनाने जय्यत तयारी तयारी केली आहे. भरजरी पोशाखात ढोल ताशा वादक, तूतारी वादक पथक ठेवण्यात आले आहे. जी-२० परिषदेसाठी निश्चित करण्यात आलेल्या ‘वसुधैव कुटुंबकम' या संकल्पनेचे फलक सर्वत्र प्रदर्शित करण्यात आले आहे. 

नमस्ते इंडिया'
जी-२० परिषदेसाठी आगमन झालेल्या प्रतिनिधींचे खास महाराष्ट्रीय संस्कृतीने स्वागत करताना त्यामागचा हेतू राजशिष्टाचार अधिकारी यांनी विषद केला असता स्वागताने भारावलेल्या प्रतिनिधींनी उत्साहात आणि मोठ्या आवाजात ‘नमस्ते इंडिया' प्रतिसाद देऊन आपला आनंद व्यक्त केला.
०००



©2024. All Rights Reserved.