ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
मुख्यमंत्र्यांचे सातारा जिल्ह्यात जल्लोषी स्वागत
  • ओमकार सोनावले
  • Fri 12th Aug 2022 08:36 am

महाबळेश्‍वर : महाबळेश्वर तालुक्याचे सुपुत्र,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर प्रथमच आपल्या जन्मगावी दरे येथे येत असल्याने कोयनाकाठ आनंदला आहे. महाबळेश्वरमधील छ. शिवाजी महाराज चौकात धुवाँधार पावसात फटाक्यांच्या आतषबाजीत मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांचे समर्थकांकडून जल्‍लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी कॅबिनेट मंत्री ना. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, पुरूषोत्तम जाधव आदी उपस्थित होते.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच महाबळेश्वर येथे येणार असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. बुधवारी रात्रीपासूनच ना. शिंदे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. समर्थकांकडून सर्वत्र स्वागताचे फलक लावण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ते आपल्या जन्मगावी दरे येथे जाण्यासाठी महाबळेशवर मार्गे निघाले असता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समर्थकांच्या आग्रहाखातर थांबले. यावेळी शिंदे यांच्या समर्थनार्थ समर्थकांकडून गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.मख्य चौकात अपर जिल्हाधिकारी श्रीमती माधवी सरदेशमुख, तहसीलदार सुषमा चौधरी पाटील यांच्यासह प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मंदिरामध्ये देवीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. महिलांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण केले.माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी ना.एकनाथ शिंदे यांना राखी बांधली. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, कॅबिनेट मंत्री ना. शंभूराज देसाई, पुरषोत्तम जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ना. शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवसेनेचे विजय नायडू, माजी नगरसेवक कुमार शिंदे, सतीश ओंबळे शिवजयंती उत्सव समितीचे प्रवीण जिमन, संतोष आखाडे आदी उपस्थित होते.ना. एकनाथ शिंदे यांना माजी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी 25 किलो वजनाचे पितळी शिवलिंग भेट म्हणून दिले तर पंचायत समितीचे माजी सभापती संजूबाबा गायकवाड, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डी. एम. बावळेकर, माजी नगरसेवक संदीप साळुंखे आदींनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सतीश ओंबळे, सलीम बागवान, सचिन शिंदे, संदीप आखाडे, सैफ वारुणकर, संतोष आखाडे, सचिन गुजर, प्रशांत उन्नीभवी, सुनील ढेबे, गणेश शिंदे, प्रमोद गोंदकर, राहुल पिसाळ, सागर सोनावणे, किरण मोरे, पालिकेचे आबाजी ढोबळे, सचिन दीक्षित व अधिकारी उपस्थित होते.शिंदेवाडी व शिरवळमध्ये झुंबडनायगाव; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे सातारा जिल्हावासियांतर्फे महामार्गावर जिल्ह्याच्या सिमेवरील शिंदेवाडी, शिरवळ येथे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळेला कॅबिनेटमंत्री ना. शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी व शिंदे गटातील शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती. शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे जेसीबीच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कॅबिनेट मंत्री शंभूराजे देसाई यांचे आगमन झाल्यानंतर सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसिलदार दशरथ काळे, फलटणचे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, शिरवळच्या सरपंच लक्ष्मी पानसरे आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्र्यांचा शाही पगडी घालून सन्मान केला. यावेळी जि. प माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, शिवसेनेचे प्रदीप माने, भूषण शिंदे, गुरुदेव बरदाडे, अनुप सूर्यवंशी, अनिरुध्द गाढवे तसेच तालुक्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. शिंदेवाडी येथील स्वागतानंतर मुख्यमंत्री शिरवळला पोहचताच भारतीय जनता पार्टीच्यावतीने निखिल झगडे आदींनी त्यांचे स्वागत केले.



©2026. All Rights Reserved.