कोरेगाव : कोरेगाव येथील हाजी महंमद बादशाह शेख मिस्त्री यांचे अल्पशा आजार तसेच वृद्धापकाळाने वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले हाजी महंमद मिस्त्री हे मोटार व्यवसायातील चांगले कारागीर होते ते कोरेगाव सह अनेक तालुक्यांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू तसेच सर्वांशी चेष्टा मस्करी करणे नेहमी हसतमुख सगळ्यांशी विचारपूस करणारा असा होता. लहानापासून आबाल वृद्धापर्यंत त्यांच्याशी एकदा ओळख झाली की कधीच ते कोणास विसरत नव्हते नेहमीच सर्वांसाठी व गोरगरिबांसाठी धावून जाणारे महंमद मिस्त्री हे सर्वांमध्ये परिचित होते. अगदी छोट्या वयापासून त्यांनी ट्रक लेलँड दुरुस्ती करणे हा मिस्त्री व्यवसाय सुरू केला होता त्यामध्ये ते अत्यंत तरबेज होते. त्यांच्या रूपाने आज कोरेगाव शहरातील एक मोटार व्यवसायातील एक नामांकित हाजी मोहम्मद मिस्त्री आपल्यातून नियतीने हिरावून नेला आहे. त्यांच्या जाण्याने कोरेगाव शहरासह मोटार व्यावसायिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले नातवंडे असा परिवार आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..
©2025. All Rights Reserved.