मलवडी : फलटण येथील लायसन क्लब फलटण गोल्डन यांच्या वतीने ज्योतिर्लिंग स्कूल व ज्युनिअर कॉलेज पवारवाडी(आसू) मधील उपशिक्षक सहदेव बजरंग गुरव यांना सुभद्रा राजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमा मध्ये बोलताना सुभद्राराजे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे कौतुक केले. शिक्षक हा समाज परिवर्तनाचे काम करतो. संस्कारीत पिढी घडवण्याचे काम करत असतो. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाची ओळख करून शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अध्यापन पद्धती स्वीकारावी असा संदेश देत त्यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. या कार्यक्रमासाठी लायसन क्लबच्या संस्थापिका सौ. उज्वला निंबाळकर, अध्यक्षा सौ. सुनंदा भोसले, सुजाता सोनवलकर, रूक्षांन भोसले, बाळासाहेब परकाळे, प्रा.चंद्रकांत किकले, माजी. प्रा. विलास शेडगे, परिवेक्षक बी. एस. नाळे, सर्व शिक्षक कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब भोसले व सूत्रसंचालन वैशाली कांबळे यांनी केले तर आभार स्वाती जगताप यांनी मांनले.
©2026. All Rights Reserved.