सातारा : सातारा शहरानजीक असलेल्या खावली गावानजीक एका शाळकरी बसने अचानक पेट घेतला.. ही बस सातारा येथील एका खाजगी शाळेतील मुलांना घेऊन कोरेगावच्या दिशेने चालली होती.. चालत्या बसमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने पेट घेतला.. ही बाब ड्युटी संपवून गावी चाललेल्या सातारा पोलिसाच्या निदर्शनात आल्याने त्यांनी बस चालकाला थांबण्याची विनंती केली.. आणि क्षणाचाही विलंब न करता बसमधील मुलांना त्यांच्या शालेय साहित्यासह सुखरूप बाहेर काढले.. या बसमधून 21 मुले घरी जात होती.. सातारा पोलिसाच्या सतर्कतेमुळे मोठी जीवित हानी टळलेले आहे.. बसने अचानक पेट घेतल्याने धुराचे लोट निर्माण झाले होते.. रस्त्यावरून जाणारे प्रवासी आणि नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले.. पोलिसाने स्थानिकांच्या मदतीने पेटलेली स्कूल बस विझवल्याने पोलिसाचे आभार मानण्यात आले असून या आगीत बसचे नुकसान झाले आहे...
©2024. All Rights Reserved.