जावली : रुईघर ता. जावली येथील गट नं. ३६१ घनशाम कुमावत व विशाल रामचंद्रन यांनी पांचगणी कुडाळ प्रजिमा २५ या रस्त्याकडेला शासकीय हद्दी मध्ये संरक्षण भिंत बांधलेली आहे. याची तक्रार दि. १६/०९/२०२१ रोजी दिली होती. त्यांना जा. क्र. जावळी / प्रकल्प / १४५४/ २०२१ दि. १५/११/२०२१. रोजी अतिक्रमण काढण्या संबंधी पत्रव्यवहार सा. बा. जावली कार्यालयाने केला होता. तसेच गट नं. ४९४ मध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून प्रजिमाच्या हद्दीत बांधकाम केले आहे. त्याचीही तक्रार दि. १७/०५/२०२२ रोजी दिली होती तदनंतर जा.क्र. जावळी / प्रकल्प / ८०० /२०२२ चे सदर पत्र सा. बा. जावली कार्यालयाने श्रीमती चंद्रीका शहा स्वीट मेमोरीज स्कूल यांना देण्यात आले होते. आज अखेर कोणतेही अतिक्रमण त्यांनी काडले नाही व प्रशासनाच्या वतीने कोणतीही कारवाई झाली नाही. सदर बाब गंभीर असून कारवाई न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने दि. ०३/१०/२०२२ रोजी सा. बा. जावली कार्यालयासमोर रिपाई (A) महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडणार. यावेळी निवेदन देताना जावली तालुका अध्यक्ष अमित साळुंखे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते
©2025. All Rights Reserved.