शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषद केंद्रशाळा भिलार येथे भेट दिली.विविध विषयावर विद्यार्थ्यांशी मनमोकळे पणाने संवाद साधला.
पुस्तकाचे गाव भिलार या प्रकलपाच्या कार्यालयास भेट देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री ना. दिपक केसरकर आले असताना भिलार येथील जिल्हा परिषद केंद्रशाळेस भेट दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले , प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम मुजावर ,महाबळेश्वर चे गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे,पुरुषोत्तम जाधव
सरपंच शिवाजी भिलारे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुभांगी भिलारे अशोक भिलारे, तेजस्विनी भिलारे ,राजेंद्र भिलारे ,प्रविण भिलारे शांताराम भिलारे ,नितीन भाई भिलारे, ,तानाजी भिलारे उपस्थित होते.
सुरुवातीला शाळेच्या प्रांगणातील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुजन केले. शिवसेना शाखेच्या वतीने युवासेना तालुका प्रमुख नितीन भिलारे ,शाखा प्रमुख अशोक भिलारे यांनी त्यांचे स्वागत केले
पुस्तकाचे गाव प्रकलपांतर्गत शाळेतील बालवाचनालयाची पाहणी केली. त्या संदर्भात आवश्यक त्या सुचना शाळेला दिल्या.
तसेच शाळेतील प्रत्येक वर्गाला भेट दिली. भेटीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दप्तराचे ओझे कमी करणे, पुस्तकात लेखनाची सुविधा असणे, डिजिटल क्लासरूम, ई लर्निग ,शालेय उपक्रम , शिक्षणातील समस्या अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांशी मनमोकळे पणाने संवाद साधला विद्यार्थ्यांनीही विचारलेल्या प्रश्नाला मोकळेपणाने उत्तरे दिली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिसादावर मंत्री महोदयांनी समाधान व्यक्त केले. उपस्थित शिक्षकांशीही संवाद साधुन सुयोग्य सुचना केल्या. यावेळी महाबळेश्वर तालुक्यातील शिक्षकांच्या वतीने शिक्षकांच्या विविध समस्येबाबत निवेदन देण्यात आले.या भेटीप्रसंगी केंद्रप्रमुख श्री.प्रकाश भिलारे ,विषय साधन व्यक्ती श्रीनिधी जोशी श्री.कुलदीप अहिवळे तसेंच ग्रामस्थ उपस्थित होते.
©2025. All Rights Reserved.