जावली : मेढा पोलीस स्टेशन मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले नागरिक, पोलीस, पोलीस पाटील ,समाजसेवक, पत्रकार इत्यादी अनेकांनी या रक्तदान शिबिरास हजेरी लावली हे रक्तदान शिबिर अक्षय ब्लड सेंटर या ब्लड बँक ने केले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने साहेब गोपनीय विभागाचे अमोल पवार साहेब तसेच पोलीस पाटील अभिजीत भोसले, कृष्णकांत महामुनी, सचिन कदम इत्यादी पोलीस पाटील, सायगाव चे सरपंच बाळासाहेब कांबळे,अक्षय ब्लड बँक मधील स्टाफ तसेच अनेक युवक रक्तदाते उपस्थित होते. खूप उत्स्फूर्तपणे अनेकांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला व आशा चांगल्या शिबिरामुळे पोलिस व नागरिकांमधील अंतर कमी होत आहे. व नागरिकांच्या मनात पोलिसांविषयी आदर निर्माण होत आहे. जावली तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक तरुणवर्गांनी भरपूर पाऊस पडत असताना देखील मेढा पोलीस स्टेशन मधील रक्तदान शिबिरास उपस्थित राहिले.
©2026. All Rights Reserved.