उंब्रज : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या आदेशानुसार समान संधी केंद्र, महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उंब्रज येथे कार्यक्रम संपन्न झाला. बार्टीचे समतादूत विशाल कांबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती, जात वैधताप्रमाणपत्र, व्यावसाय, रोजगार आदींबाबत सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य अनिल पोतदार यांनी विद्यार्थ्यांनी विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ घ्यावा.असे सांगुन विद्यालयाच्यावतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल.मनामध्ये उच्च शिक्षण घेण्याची ज्योत पेटली पाहिजे.असेही त्यांनी विविध उदाहरणाद्वारे स्पष्ट केले. प्रा.रमेश मस्के यांनी प्रास्ताविक केले. प्रा.संजय तोरवणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.जगताप यांनी आभारप्रदर्शन केले.
©2025. All Rights Reserved.