राज्य शासनाने जिल्हाधिकारी व नगरपालिका, नगरपंचायत यांना पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करणेबाबत कळविण्यात आले आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई
- सातारा जिल्हाधिकारी यांचे आदेश
सातारा : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांनी दि.१२ मे २०२० रोजी पारीत केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही विषारी, अजैविक कच्चा माल (जसे की , पारंपारिक चिकणमाती आणि माती तसेच प्लास्टिक आणि थर्माकोल (पॉलीस्टीरिन) विरहित नैसर्गिक, जैव-विघटनशील, पर्यावरणास अनुकूल असलेल्या कच्च्या मालापासून बनवलेल्या मूर्तींना प्रोत्साहन/अनुमती देण्यात यावी व प्लास्टर ऑफ पॅरिस (PoP) च्या मूर्तींवर बंदी घालण्यात यावी, असे सूचविण्यात आलेले आहे. तसेच ही मार्गदर्शक तत्त्वे धार्मिक उत्सव साजरे करताना नैसर्गिक जलस्रोतांच्या गुणवत्तेवर व पर्यावरणावर कोणताही परिणाम न होता पर्यावरणपूरक मूर्तीचे विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी तयार करण्यात आलेले आहेत. तसेच या बाबत मुंबई उच्च न्यायालयात रिटपिटीशन दाखल झालेले आहे. ही बाब न्याय प्रविष्ठ आहे.
राज्य शासनाने जिल्हाधिकारी व नगरपालिका, नगरपंचायत यांना पी.ओ.पी. (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या मूर्ती बनविणे व विक्री करणेस प्रतिबंध करणेबाबत कळविण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी सातारा यांनी या आदेशामध्ये अंशता बदल करुन दि. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सातारा जिल्हयातील कुंभार समाजाकडे विक्रीसाठी तयार असणाऱ्या पी.ओ.पी. च्या मूर्ती वितरण/विक्री करणेस मुभा देण्यात आलेली होती. परंतु तदनंतर म्हणजेच दि.१ सप्टेंबर २०२२ पासून सातारा जिल्हयामध्ये पी.ओ.पी (प्लास्टर ऑफ पॅरिस) च्या सर्व प्रकारच्या मूर्ती बनविणे, आयात करणे, वितरण करणे, खरेदी व विक्री करणेस प्रतिबंध केलेला आहे. तसेच सदर आदेशाची नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सातारा यांना कडेकोट अंमलबजावणी करण्याबाबत कळवण्यात आले आहे.
©2024. All Rights Reserved.